डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा ‘संसद रत्न पुरस्कार’ जाहीर

0

नवी दिल्ली : देशातील संसदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “संसद रत्न पुरस्कार २०२६” यंदा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा त्यांना हा सन्मान प्राप्त होत असून, २०२४ नंतर पुन्हा एकदा त्यांच्या संसदीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संसदेत नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे, देशहिताच्या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणे, विकास, आरोग्य, पायाभूत सुविधा, युवक, रोजगार, शहरी प्रश्न प्रभावीपणे मांडणे. याचबरोबर त्यांनी एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी मांडलेल्या सहा महत्त्वाच्या खासगी विधेयकांच्या अनुषंगाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

संसद रत्न पुरस्कार समितीच्या घोषणेनुसार, यंदा देशभरातील १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय समित्यांमधील खासदारांची निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेमध्ये खासदारांची संसदेतील उपस्थिती, चर्चांमधील सहभाग, विचारलेल्या प्रश्नांची गुणवत्ता, जनहिताच्या मुद्द्यांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा, खासगी विधेयक आणि संसदीय योगदानाचा व्यापक आढावा घेतला जातो.

संसद रत्न पुरस्काराची स्थापना २०१० साली ‘प्राईम पॉईंट फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत करण्यात आली होती. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनंतर या पुरस्काराला सुरुवात झाली. संसदीय लोकशाही अधिक सक्षम व्हावी, लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये प्रभावीपणे जनतेचे प्रश्न मांडावेत आणि सकारात्मक संसदीय परंपरांना प्रोत्साहन मिळावे हा या पुरस्कारामागील मुख्य उद्देश आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech