बांगलादेशला परत जाण्यासाठी सीमेवर अवैध स्थलांतरितांची गर्दी

0

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू सरकारच्या ‘डिटेक्ट, डिलीट अँड डिपोर्ट’ धोरणाचा परिणाम दिसू लागला आहे. बांग्लादेशात परत जाण्यासाठी सीमेवर अवैध स्थलांतरितांची गर्दी जमू लागली आहे. भाजपाने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पक्षाने लिहिले, “उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हाकीमपूर सीमाक्षेत्रात लोक पुन्हा एकदा बांग्लादेशात परत जाण्यासाठी जमा झाले आहेत.” भाजपाने पुढे म्हटले, “जेव्हा एसआयआर प्रक्रिया सुरू झाली होती, तेव्हाही असेच दृश्य पाहायला मिळाले होते. आता होल्डिंग सेंटर सुरू झाल्यानंतर आणि अवैध बांग्लादेशी स्थलांतरितांविरोधात भाजप सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर सीमावर्ती भागात लोक पुन्हा जमा होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.”

कथितरित्या हे लोक पश्चिम बंगालच्या विविध भागांत अवैधरित्या राहत होते. मात्र भाजप सत्तेत आल्यानंतरच अवैध स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मालदा येथे यासाठी एक होल्डिंग सेंटरही उभारण्यात आले आहे. येथे अवैध स्थलांतरितांना ठेवले जाईल आणि त्यानंतर त्यांना डिपोर्ट केले जाईल. अलीकडेच एका बैठकीत शुभेंदूंनी म्हटले होते की, जे लोक सीएएच्या कक्षेबाहेर आहेत, त्यांना अवैध घुसखोर मानले जाईल आणि त्यांना बीएसएफच्या ताब्यात दिले जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech