ठाण्याचे शिवसेना पदाधिकारी किरण नाकती यांना मातृशोक

0

ठाणे : ठाण्यातील नौपाडा शिवसेना विभागप्रमुख किरण विष्णु नाकती यांच्या मातोश्री लक्ष्मी विष्णु नाकती यांचे शनिवारी पहाटे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे नाकती कुटुंबीयांसह शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

लक्ष्मी नाकती या शांत, प्रेमळ आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात मुलगा किरण नाकती, सून तसेच नातू आदित्य आणि अथर्व असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दुःखद प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, शिवसेना राज्य सचिव रामभाऊ रेपाळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक, मान्यवर नागरिक, पत्रकार, आप्तेष्ट आणि मित्रमंडळींनी उपस्थित राहून दिवंगत लक्ष्मी नाकती यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच नाकती कुटुंबीयांचे सांत्वन केले. लक्ष्मी नाकती यांच्या निधनाने नाकती कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech