संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ

0

मुंबई : झी मराठी  च्या नव्याने दाखल होणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेच्या निमित्ताने कृष्णानदीच्या निसर्गरम्य वातावरणात, संगममाऊली येथे विशेष पत्रकार परिषद आणि प्रेक्षक भेटीचे आयोजन करण्यात आले. कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर वसलेला हा घाट मनमोहक वातावरणासाठी ओळखला जातो. हिरवाईने नटलेला परिसर, नदीचे शांत पात्र आणि आध्यात्मिक वातावरण यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली.

‘कृष्णाईच्या लेकी’ ही एका आई आणि तिच्या तीन मुलींची हृदयस्पर्शी कथा आहे. कुटुंब, नाती, संघर्ष आणि एकमेकांना दिलेली साथ यांची गोष्ट सांगणारी ही मालिका कोल्हापूरच्या कृष्णाईच्या मातीत चित्रित झाली आहे. त्यामुळे या मालिकेच्या शुभारंभासाठी संगममाऊली सारख दुसरं स्थान नाही. जस नद्यांचा संगम एकतेचा संदेश देतो तसेच मालिकेतील ‘कृष्णाई’ आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते.

कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी कृष्णा नदीची आरती करून झाली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि पत्रकारांसाठी मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात आला. गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती. आतापर्यंत फक्त प्रोमोमध्ये आणि टीव्ही वर पाहिलेले कलाकार प्रत्यक्ष भेटल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अनेकांनी कलाकारांसोबत फोटो काढले आणि संवाद साधला. यानंतर मालिकेतील कलाकार एकता लब्दे (शारदा), ट्विंकल यादव (गौरी), नारायणी वर्ने (सौदामिनी), रोहित परशुराम (शंकर) आणि स्मिता सरवदे (सत्यभामा ) यांनी आपल्या व्यक्तिरेखांविषयी चर्चा केली. मालिकेत कृष्णाईची भूमिका साकारणाऱ्या *निवेदिता सराफ* यांनी कथेचा गाभा, व्यक्तिरेखांची वैशिष्ट्ये आणि प्रेक्षकांना या कथेशी कसे सहज नाते जोडता येईल याबद्दल मनोगत व्यक्त केले.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech