एआय करिअरला नवा आकार देत असताना डब्ल्यूपीयू गोवा उच्च शिक्षणात ट्रान्सडिसिप्लिनरी (आंतरशाखीय) दृष्टिकोनाला समर्थन देत आहे

0

युनिव्‍हर्सिटीमधील नेतृत्‍वाने वेगवान तंत्रज्ञान बदलांच्या या युगात अनुकूलता, आजीवन शिक्षण आणि ट्रान्सडिसिप्लिनरी शिक्षणाच्या वाढत्या गरजेवर भर दिला

आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) आणि वेगवान तंत्रज्ञान बदल जगभरातील उद्योगांना नवा आकार देत असताना युनिव्‍हर्सिटीजनी विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या पहिल्या नोकरीसाठी तयार करण्यापलीकडे जाणे आवश्यक आहे. त्याऐवजी, त्यांना आयुष्यात येणाऱ्या अनेक करिअर बदलांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे, असे मत २० जून रोजी आयोजित वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू) गोवाच्या नागपूर मध्ये आयोजित ओपन हाऊसमध्ये प्रवक्त्यांनी व्‍यक्त केले.

या इव्‍हेण्‍टमध्‍ये भावी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणतज्ज्ञ एकत्र आले होते. वाढत्या अनपेक्षित जगात उच्च शिक्षणाचे भविष्य आणि युनिव्‍हर्सिटीजकडून बदलत असलेल्या अपेक्षा यावर यावेळी सखोल चर्चा झाली. या संपूर्ण संवादाच्या केंद्रस्थानी डब्ल्यूपीयू गोवाचे ट्रान्सडिसिप्लिनरी शैक्षणिक मॉडेल होते, जे एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासोबत विविध क्षेत्रांचा एकत्रित विचार करण्याची क्षमता, बदल स्वीकारण्याची तयारी आणि वास्तविक जगातील गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड देण्याचे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्‍न करते.

“डब्ल्यूपीयू गोवाची स्थापना एका ट्रान्सडिसिप्लिनरी (आंतरशाखीय) दृष्टिकोनातून केली जात आहे, जी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना एकाच विषयाच्या सीमांच्या पलीकडे जाऊन विविध दृष्टिकोनांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित करते. प्रत्‍यक्ष अनुभवजन्य शिक्षण, उद्योग क्षेत्राशी जोडणी, जागतिक अनुभव आणि सक्रिय शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून पदवीधरांना आयुष्यभर शिकण्यासाठी, परिस्थितीनुसार बदलण्यासाठी आणि नेतृत्वासाठी सज्ज करण्याचे युनिव्‍हर्सिटीचे उद्दिष्ट आहे. तसेच यामुळे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात उत्कृष्ट नोकऱ्यांची संधी खुल्‍या होतील, जिथे विद्यार्थी त्यांनी शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष वापर करू शकतील,” असे व्‍हाइस चान्‍सलर प्रोफेसर वॉल्टर लील म्हणाले.

“विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या नोकरीसाठी तयार करणे पुरेसे आहे, असे गृहीत धरून युनिव्‍हर्सिटीज आता चालणार नाहीत,” असे डब्ल्यूपीयू गोवाचे प्रो व्‍हाइस चान्‍सलर डॉ. आशिष भारद्वाज म्हणाले. “त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात येणारे अनेक बदल, स्थित्यंतर आणि संधींना सामोरे जाण्यासाठी सक्षम होत आहेत का? भविष्य केवळ विशिष्ट विषयातील तज्ज्ञांचे नसेल, तर अशा व्यक्तींचे असेल, जे सतत शिकू शकतात, वेगवेगळ्या क्षेत्रांतील कल्पनांची सांगड घालू शकतात आणि पारंपारिक चौकटीत न बसणाऱ्या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देऊ शकतात.”

पारंपारिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत उद्योग क्षेत्र अधिक वेगाने बदलत असल्याने उच्च शिक्षणाबद्दल जुन्‍या गृहितकांचे कशाप्रकारे निराकरण होत आहे, याचा या चर्चेत आढावा घेण्यात आला. नवीन व्यवसाय समोर येत आहेत, प्रस्थापित भूमिका बदलत आहेत आणि एकाच विषयात काम करणाऱ्यांपेक्षा अनेक क्षेत्रांतील कौशल्यांचा मेळ घालणाऱ्या व्यक्तींकडून बाजारपेठेत स्पर्धा वाढताना दिसत आहे.

तंत्रज्ञान कौशल्यांइतकेच शिकण्याची वृत्ती, अनुकूलता आणि वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये काम करण्याची क्षमता भविष्यात महत्त्वाची ठरणार असल्याचे उपस्थितांना सांगण्यात आले. या संवादात भावी करिअरसाठी आवश्यक असणारी जिज्ञासा, संकटांवर मात करण्याची क्षमता आणि आजीवन शिक्षण यांसारख्या मुलभूत गुणांच्या वाढत्या महत्त्वावरही प्रकाश टाकण्यात आला.

प्रवक्त्यांनी भर दिला की, उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना केवळ सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवसायांसाठी प्रशिक्षित करण्याऐवजी भविष्यातील अशा संधींसाठी तयार करावे ज्यांचा आज अंदाज लावणे कठीण आहे.

डब्ल्यूपीयू गोवामध्ये सध्या बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सीएसई), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ऑनर्स), बी.डेस. इन इंटिग्रेटेड प्रॉडक्ट डिझाइन, बी.डेस. इन कम्युनिकेशन डिझाइन, आणि बी.एससी (ऑनर्स) इन सायकॉलॉजी हे कोर्स उपलब्ध आहेत.

भविष्यातील कामाच्या स्वरूपाविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये स्पष्टता नसताना या चर्चेने उच्च शिक्षण संस्थांच्या जबाबदारीला प्रकाशझोता आणले. युनिव्‍हर्सिटीजनी केवळ रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक जीवनात येणाऱ्या निरंतर बदलांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech