· शाश्वत गतिशीलतेच्या दिशेने भारताच्या वेगाने होत असलेल्या वाटचालीचा हा टप्पा म्हणजे एक पुरावा आहे.
· भक्कम इन हाउस इंजिनीअरिंग, नावीन्य आणि उत्पादन क्षमतांच्या आधारावर, TVS iQube देशभरात इलेक्ट्रिक गतिशीलतेचा स्वीकार वाढवण्याचे कार्य सातत्याने करते आहे.
बेंगळुरू : दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांमधील जागतिक स्तरावरील प्रसिद्ध उत्पादक आणि टीव्हीएस (TVS) वेणू समूहाचा भाग असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने आज होसूर येथील आपल्या उत्पादन प्रकल्पातून दहा लाखाव्या टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube) गाडीचे उत्पादन पूर्ण झाल्याची घोषणा केली. भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासातील हा टप्पा म्हणजे एक महत्त्वपूर्ण अध्याय असून, शाश्वत, स्मार्ट आणि आत्मनिर्भर वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने देशाने केलेल्या प्रगतीचे हे निदर्शक आहे.
विकसित भारताच्या संकल्पनेच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, इलेक्ट्रिक मोबिलिटी ही शाश्वत विकास, ऊर्जा संक्रमण आणि तांत्रिक नेतृत्वासाठी एक प्रमुख सक्षम घटक म्हणून समोर येते आहे. भारताच्या ईव्ही प्रवासातील एक अग्रणी म्हणून, टीव्हीएस मोटरने इन हाउस इंजिनीअरिंग, संशोधन आणि विकास (R&D), उत्पादन नवकल्पना आणि परिसंस्थेच्या विकासात सातत्यपूर्ण गुंतवणूक करून या श्रेणीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतातच डिझाइन, इंजिनीअर आणि उत्पादित केलेली, टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube) ही जगासाठी टीव्हीएस मोटरच्या आत्मनिर्भरता आणि तांत्रिक क्षमतेवरील लक्ष केंद्रित करण्याचे प्रतीक आहे, जी भारतीय कल्पकतेला गुणवत्ता, कार्यक्षमता आणि टिकाऊपणाच्या जागतिक मानकांशी जोडते.

या महत्त्वपूर्ण टप्प्यावर भाष्य करताना टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष सुदर्शन वेणू म्हणाले, “दहा लाख टीव्हीएस आयक्यूब्स (TVS iQubes) बाजारात आणणे हे दर्शवते की, इलेक्ट्रिक मोबिलिटी हा भारतातील दैनंदिन जीवनाचा मोठ्या प्रमाणावर भाग बनत आहे. हा टप्पा अभियांत्रिकी, नावीन्य आणि उत्पादन क्षमतांमधील अनेक वर्षांच्या गुंतवणुकीचे फळ आहे; या गुंतवणुकीमुळेच आम्हाला जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक मोबिलिटी उत्पादने भारतातच डिझाइन आणि उत्पादित करून विकसित करणे शक्य झाले आहे, जी जगासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. विकसित भारत या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असताना, भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येण्याची भारताकडे एक अद्वितीय संधी आहे. अशा आकर्षक आणि शाश्वत मोबिलिटी उपायांद्वारे या ध्येयाला पुढे नेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, जे मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक महासत्ता म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट करतील.”
2020 मध्ये लाँच झाल्यापासून, TVS iQube हा भारतातील सर्वाधिक पसंतीचा इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड आणि देशातील सर्वात आवडता कौटुंबिक इलेक्ट्रिक वाहन (EV) पर्याय बनला आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेल्या या श्रेणीचा विस्तार विविध बॅटरी क्षमता, रेंजचे पर्याय आणि कनेक्टेड फीचर्सपर्यंत करण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या प्रवासाच्या गरजांसाठी सर्वोत्तम आणि साजेशी इलेक्ट्रिक स्कूटर निवडणे शक्य झाले आहे. 3,000 हून अधिक शहरांमधील 3,300 हून अधिक विक्री तसेच सेवा केंद्रांचे भक्कम जाळे आणि उत्पादन तसेच क्षमता वाढीसाठी केलेली निरंतर गुंतवणूक यांच्या जोरावर, TVS iQube ने देशभरातील ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
TVS iQube चालवणाऱ्यांच्या वाढत्या संख्येने भारतात शाश्वत गतिशीलतेचा वेगाने स्वीकार करण्यासोबतच पर्यावरणावर महत्त्वपूर्ण सकारात्मक प्रभाव पाडला आहे. बाजारात आल्यापासून, TVS iQube च्या ग्राहकांनी एकत्रितपणे 14.94 अब्ज किलोमीटरहून अधिक अंतर कापले आहे, ज्यामुळे 5,22,969 टन कार्बन उत्सर्जन टाळण्यास मदत झाली आहे. TVS iQube समुदायाने साधलेली ही कार्बन बचत जवळपास 2 कोटी 9 लाख (20.9 दशलक्ष) झाडे लावण्याइतकी आहे; यावरून इलेक्ट्रिक गतिशीलतेमुळे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष प्रभावाची प्रचिती येते. वैयक्तिक गतिशीलतेचे निर्णय भारताच्या शाश्वतता आणि ऊर्जा-संक्रमण विषयक व्यापक उद्दिष्टांमध्ये एकत्रितपणे कशा प्रकारे योगदान देतात, हे यातून समोर येते.