टिसीएस प्रकरणांमध्ये निदा खानला जामीन मंजूर

0

नाशिक : कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात असलेली निदा खान हिला व तौसिफ खान याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या धर्मांतरण प्रकरणांमध्ये पहिला जामीन मंजूर झाला आहे. टीसीएस कंपनीशी संबंधित बहुचर्चित धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान आणि तौसिफ अत्तार यांना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. निदा खान ही गर्भवती असल्याने आणि तिच्यावरील आरोपांची पार्श्वभूमी लक्षात घेत न्यायालयाने हा दिलासा दिला. मात्र, याच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार जोशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात या संदर्भात पहिला गुन्हा सर्वसाधारण मार्च २०२६ ला दाखल करण्यात आला होता. पीडित युवतीच्या तक्रारीनुसार, या गुन्ह्यात बलात्कार, धार्मिक भावना दुखावणे, फसवणूक आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) विविध गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. या संपूर्ण गुन्ह्यात निदा खानचे नाव समोर आले होते. पीडित महिलेला बुरखा देणे, धार्मिक साहित्य पुरवणे आणि तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर होता. तसेच पीडितेच्या मोबाईलमध्ये विविध धार्मिक अॅप्स इन्स्टॉल करून देण्यात तिने मदत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणात संशयित आरोपी निदा खान आणि तौसिफ अत्तार यांच्या वतीने नाशिकमधील नामांकित विधिज्ञ राहुल कासलीवाल आणि अॅड. प्रतीक ताजनपुरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित दानिश शेख याला मात्र न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. त्याचे गुन्ह्यातील गांभीर्य पाहता त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech