प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवा महाला यांचे स्मारक बांधणार – मंत्री शंभूराज देसाई

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीच्या वेळी सय्यद बंडा याच्या जीवघेण्या तलवारीच्या वारापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वीर जीवा महाला (जिवाजी महाले) यांनी रक्षण केले. असे शूर मावळे जीवा महाला यांचे स्मारक पर्यटन विभागाच्या जागेत प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी १ कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. १० नोव्हेंबर या दिवशी प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने गडावर लाखो शिवप्रेमी येतात. या स्मारकामुळे ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटनाचे महत्त्व आणखी वाढेल. वीर जीवा महाला यांच्या पराक्रमाची गाथा पोचेल. हे स्मारक निर्माण व्हावे, अशी शिवप्रेमी, इतिहासकार यांची अनेक वर्षांपूर्वीची मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्मारक करण्याचा निर्णय घेतला आहे, असे शंभूराज देसाई यांनी सभागृहात सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech