वनप्लस एन६एक्स स्मार्टफोन भारतात लॉन्च

0

मुंबई : वनप्लसने शुक्रवारी भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव वनप्लस एन६एक्स असे आहे. कंपनीने नुकतीच एन सीरिजची सुरुवात केली होती आणि वनप्लस एन६एक्स हा या सीरिजमधील दुसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी कंपनीने वनप्लस एन६ हा फोन सादर केला होता. बजेट सेगमेंटमधील ग्राहकांना लक्षात घेऊन वनप्लसने ही नवीन सीरिज बाजारात आणली आहे. वनप्लस एन6एक्स हा ड्युअल सिम स्मार्टफोन असून तो अँड्रॉइड १६ वर आधारित कंपनीच्या नवीन ऑक्सिजनओएस १६ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. या फोनमध्ये ६.८ इंचाची एचडी प्लस एलसीडी टचस्क्रीन देण्यात आली आहे. या डिस्प्लेला १२० हर्ट्झपर्यंत रिफ्रेश रेट, २५४ पीपीआय पिक्सेल डेन्सिटी आणि ९०० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळते. कंपनीच्या माहितीनुसार हा फोन एमआयएल-एसटीडी-८१०एच ड्युरेबिलिटी सर्टिफिकेशनसह येतो, त्यामुळे तो अधिक मजबूत आणि टिकाऊ असल्याचा दावा करण्यात आला आहे.या स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये विविड आणि नॅचरल स्क्रीन कलर मोड, डार्क मोड, स्क्रीन कलर टेम्परेचर बदलण्याचा पर्याय तसेच आय प्रोटेक्शन मोड देण्यात आला आहे. फोनमध्ये १९.६:९ आस्पेक्ट रेशोची स्क्रीन मिळते.

कामगिरीसाठी वनप्लस एन6एक्समध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक डायमेंसिटी ६३६० एपेक्स प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन गरम होऊ नये यासाठी कंपनीने ५३०० चौरस मिलीमीटर क्षेत्रफळ असलेली व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टिम दिली आहे. यामुळे जास्त वेळ गेमिंग किंवा इतर जड कामे करताना फोनचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल. हा स्मार्टफोन ५जी नेटवर्कला सपोर्ट करत नसून ४जी कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, वनप्लस एन6एक्सच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पुढील बाजूस ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये ७००० एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हा फोन जवळपास अडीच दिवस वापरता येऊ शकतो.

वनप्लस एन6एक्सची सुरुवातीची किंमत १८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मॉडेल मिळेल. तर ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या दुसऱ्या प्रकाराची किंमत २०,९९९ रुपये आहे. कंपनीकडून निवडक बँक कार्डवर १५०० रुपयांपर्यंत त्वरित सवलत दिली जात आहे. तसेच ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय सुविधाही उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना हा फोन बर्गंडी रेड आणि आईस ब्लू या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech