मुंबई : इबिक्सकॅश(EbixCash), भारतातील अग्रगण्य डिजिटल पेमेंट आणि फ़िन्टेक सोल्युशन्स प्रदान करणाऱ्या कंपनीद्वारे आज भीम युपीआय(BHIM UPI) वर उपलब्ध होणाऱ्या आपल्या नव्या प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट(Prepaid Payment Instrument (PPI) Wallet) वॅलेटची घोषणा करण्यात आली, यामुळे आता 14 लाखापेक्षा अधिक सक्रिय वॅलेट वापरकर्त्यांना सहजतेने त्यांचा वॅलेटचा वापर करून युपीआय पेमेंट(UPI payment) शी लिंक करून युपीआय क्यूआर पेमेंट (UPI QR payments)करता येऊ शकेल.
या एकत्रिकरणामुळे इबिक्सकॅशचा (EbixCash’s) डिजिटल पेमेंट प्रवासाला अधिक गती मिळाली असून, त्यांना आपले वॅलेट भारताचा आंतरिक कार्यकारी युपीआय(UPI) प्रणालीमध्ये आणता आले आहे. या वॅलेटचा माध्यमाने सध्या सुमारे ₹2 कोटी एवढे मासिक व्यवहार केले जातात, तसेच या व्यासपिठावर दररोज साधारण 100 नवीन युझर्स जोडले देखील जातत.
भीम युपीआय(BHIM UPI) सह,एकत्र आल्याने इबिक्सकॅश वॅलेट(EbixCash Wallet) ग्राहकांचा अस्तित्वात असलेल्या युपीआय पेमेंट अनुभवाचा एक भाग बनणार असून, यामुळे त्या ग्राहकांना आपल्या वॅलेटचा उपयोग हा क्यूआर कोडवर(QR-code-based) आधारीत पेमेंट्सकरता, करता येणार आहे, असे केल्याने त्यांना आणखीन एखाद्या वेगळ्या पेमेंट प्रक्रियेचा भाग व्हावे लागणार नाही. हे पाऊल नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ़ इंडियाचा(National Payments Corporation of India’s (NPCI)) माध्यमाने उचलले गेले असून, याचा दृष्टीकोन हा अधिक खुल्या, आंतरिक कार्यकारी आणि सामावून घेणाऱ्या डिजिट पेमेंट प्रक्रियेचा भाग बनण्याचा आहे यामुळे ग्राहकांना प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सचा माध्यमाने युपीआय(UPI) रचनेमध्येच सहज कारभार करता येणार आहे.
ही घोषणाकरते वेळी बोलताना इबिक्सकॅशचे, एव्हीपी- प्रोडक्ट ॲन्ड अलायन्स, श्री. शरण परदेसी म्हणाले, “ डिजिटल पेमेंट आता आंतरिक कार्यकारी पद्धतीकडे वळत असून, यामुळे ग्राहकांना विविध व्यासपिठांवर आपल्या पेमेंट इन्श्ट्रुमेंट्सचा लवचिकतेने वापर करता येतो. वॅलेट व्यवसायामध्ये, भीम युपीआयवर (BHIM UPI) त्याची उपलब्धीच, खर्च करण्याची ताकद वाढविते आणि ग्राहकाला इतर युपीआय(UPI) पेमेंट्सकरीता आपल्या वॅलेटचा वेगळा असा विचार करावा लागत नाही. झालेल्या या बदलामुळे येत्या काही महिन्यात नोंदणी वाढतील, व्यवहाराचे स्वरूप बदलेल आणि व्यापारातील वापर देखील वाढेल.”
भीमयुपीआय (BHIM UPI) सह एकत्र येण्यामागे इबिक्सकॅशचा (EbixCash’s) डिजिटल पेमेंट धोरणाकडे बघण्याचा विस्तारीत दृष्टीकोन आहे, यामध्ये पुढे जाऊन वॅलेट आंतरिक कार्यकारीता अधिक वाढवून अतिरिक्त युपीआय (UPI )व्यासपिठांवरती येणाचा विचार आहे, जसे गुगल पे आणि फ़ोनपे ज्यामुळे मग ग्राहकांना इबिक्सकॅश वॅलेट(EbixCash Wallet ) चा माध्यमाने संपूर्ण डिजिटल पेमेंट प्रणालीचा हवा तसा वापर करता येऊ शकेल.