दीप-ज्योतीच्या नात्यापासून तारिणीच्या मिशनपर्यंत; ‘झी मराठी’वर या आठवड्यात काय घडणार?

0

मुंबई : आपल्या आवडत्या मालिकांमध्ये पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नेहमीच असते. एखाद्या पात्राच्या मनात दडलेली भावना कधी व्यक्त होणार, एखादं रहस्य कधी उलगडणार किंवा मिशन यशस्वी होणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. ‘झी मराठी’च्या मालिकांमध्ये या आठवड्यात अशीच उत्सुकता कायम ठेवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटना पाहायला मिळणार आहेत. ‘दीपज्योती’, ‘तारिणी’ आणि ‘देवमाणूस मधला अध्याय’ या मालिकांमध्ये प्रेम, संघर्ष, धाडस आणि रहस्य यांचा संगम पाहायला मिळणार आहे.

‘दीपज्योती’ मध्ये दीपच्या नव्या व्यवसायासमोर स्थानिक खंडणीखोरांचं आव्हान उभं राहणार आहे. या दबावामुळे परिस्थिती गंभीर होते . या प्रसंगात ज्योती दीपला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात दीपच्या आयुष्यात ज्योतीचं स्थान किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव या घटनांमधून अधिक स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दीप ज्योतीची रिक्षा परत मिळवून देतो. या घटनेमुळे दोघांमधील नात्याला आणखी एक भावनिक वळण मिळणार आहे. दुसरीकडे, दीपच्या मित्रांना त्याच्या मनातील बदल जाणवू लागतात. ज्योतीबद्दल दीपच्या मनात प्रेम निर्माण झालं आहे, हे त्याच्या मित्रांच्या लक्षात येतं. मात्र दीप स्वतःच्या भावनांचा स्वीकार करण्यास तयार नाही.

गोकुळाष्टमीच्या दिवशी मात्र दीपच्या मनातील हे भाव बदलणार आहेत. दुसरीकडे, प्रीतीची मंगळागौर सुलोचनासोबतच्या संघर्षाला कारणीभूत ठरणार आहे. मंगळागौरीच्या निमित्ताने सुरू झालेला हा वाद पुढे संघर्षात बदलणार आहे. या सगळ्या घडामोडींकडे आत्या वेगळ्या नजरेने पाहत आहे. दीपच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल पाहून त्याच्या आयुष्यात एखादी गूढ मुलगी आली आहे, असा विश्वास आत्याला वाटू लागतो. ही गूढ मुलगी कोण आहे आणि दीपच्या बदलामागे ज्योतीच आहे, हे आत्याला समजणार का?, याची उत्सुकता वाढणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech