अभिषेक बॅनर्जींचे खासगी सचिव सुमित रॉय सीआयडीच्या ताब्यात

0

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे खासगी सचिव सुमीत रॉय यांना पश्चिम बंगाल सीआयडीने ताब्यात घेतले आहे. रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे. पश्चिम बंगालमधील साल्बोनी येथील सरकारी जमिनीच्या कथित बेकायदेशीर खरेदी-विक्रीशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीच्या पथकाने कोलकाता येथील कालीघाट परिसरातील अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानातून सुमित रॉय यांना ताब्यात घेतले. साल्बोनी जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीने यापूर्वीही सुमित रॉय यांना अनेक वेळा समन्स बजावले होते.

दरम्यान, याच प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ६ ऑगस्ट रोजी सुमित रॉय यांच्या अटकेला अंतरिम संरक्षण देत त्यांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गुरुवारी सुप्रीम कोर्टाने त्यांची जामीनपूर्व याचिका फेटाळून लावली. तसेच अटकेपासून दिलेले संरक्षणही मागे घेतले.सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर सीआयडीने तत्काळ कारवाई करत सुमित रॉय यांना ताब्यात घेतले. सरकारी जमिनीच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech