रियादमधील दोन विमानतळांवरील हूती हल्ल्यांचा भारताकडून निषेध

0

नवी दिल्ली : येमेनमधील इराणसमर्थित हूती गटाने सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथील दोन विमानतळांवर केलेल्या हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात रियादमधील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला. या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याचे मंत्रालयाने नमूद केले.

रियादमधील आभा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळांना गेल्या काही दिवसांत लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्यांचा भारत निषेध करतो. या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे सांगत भारताने मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच जखमी नागरिकांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत भारताने सौदी अरेबियातील नागरिक आणि सरकारसोबत एकजूट असल्याचे स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech