नाना पाटेकर यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांकडून तपास सुरू

0

पणजी : चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर गोव्यातील पणजी पोलीस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात गोवा पोलीस नाना पाटेकर यांच्या जवळच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवण्याचीही तयारी करत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आज सांगितले की, अभिनेत्याच्या निधनानंतर पणजी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) च्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू आहे. गुरुवारी पहाटे नाना पाटेकर यांना त्यांच्या निवासस्थानी त्रास होण्यास सुरुवात झाल्यापासून ते रुग्णालयात पोहोचले आणि तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले, या संपूर्ण घटनाक्रमाची पोलीस चौकशी करणार आहेत.

गोव्यातील मणिपाल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पणजी पोलीस ठाण्यात फोन करून नाना पाटेकर यांच्या निधनाची माहिती दिली होती. त्यावेळी अभिनेत्याला मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करणार आहेत. तसेच गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन करण्यात येणार असून, कुटुंबीय आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जाणार आहेत. नाना पाटेकर यांच्या मृत्यूची परिस्थिती आणि कारण यांचा पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. तपासात मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाल्यास नियमानुसार प्रकरण बंद करण्यात येईल. मात्र, तपासादरम्यान काही गैरप्रकार किंवा संशयास्पद बाबी आढळल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

दरम्यान, गुरुवारी पहाटे नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर सकाळीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अश्रुपूर्ण निरोप देण्यात आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech