अभिजीत दीपकेच्या आजीचे निधन, पोलिसांकडून गावी जाण्याची मुभा

0

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनरत असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) प्रमुख अभिजीत दीपके यांच्या आजीचे शनिवारी सकाळी हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या गावी निधन झाले. पोलिसांनी शेकडो आंदोलकांसह अभिजीतला ताब्यात घेतले आहे. परंतु, त्याच्या आजीच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर प्रशासनाने मानवीय संवेदना जपत दीपकेला अंत्यदर्शनासाठी गावी जाण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान अभिजीत गावी जाणार की, आंदोलनात कायम राहणार याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

सीजेपीने दिल्लीच्या जनंतर मंतर येथे शनिवारी आंदोलनाची हाक दिली होती. सदर संघटनेच्या आक्रमक आंदोलनाचा पूर्वानुभव लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र दलाचे सुमारे २३ हजार जवान आणि दिल्ली पोलिसांचे ५ हजार कर्मचारी तैनात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, यूट्यूबर ध्रुव राठी यालाही गुरुग्राम येथील निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आलेय. प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्रातील तरुण अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची घोषणा अभिजीत दिपके यांनी पूर्वनियोजित व्हिडिओद्वारे केली. त्यामुळे प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन पुढे सुरू ठेवण्याची भूमिका पक्षाकडून घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech