नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली त्यांना मंदिर मार्ग येथील एसीएम न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना शांतता राखण्याच्या हमीपत्रावर (पीस बॉण्ड) स्वाक्षरी करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी अभिजीत दीपके यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार शांतता भंग होण्याची शक्यता असल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले.न्यायालयात दोन्ही बाजूंकडून बराच वेळ युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने दीपके यांना काही अटींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला. शांतता राखण्यासाठी हमीपत्र सादर करण्यासही त्यांना सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जामिनासोबत विविध अटी घालण्यात आल्या आहेत. भविष्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाऊ शकते. तिरंगा मार्चदरम्यानही घेतले होते ताब्यातयापूर्वी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी तिरंगा मार्चदरम्यान दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांना काही सूचना दिल्यानंतर सोडण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.