राहुल गांधींचे विदेशी संघटनांशी कथित संबंध- गौरव भाटिया

0

‘प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल’ आणि ‘इंडियन अलायन्स पॅरिस’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

निधी, बैठका आणि आंदोलनांतील समन्वयाबाबत काँग्रेसकडून स्पष्टीकरणाची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे काही विदेशी संघटनांशी कथित संबंध असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे. या संघटनांकडून भारतातील आंदोलनांना प्रोत्साहन दिले जात असून, देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कथित प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला. भाटिया यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ‘प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल’ आणि फ्रान्सस्थित ‘इंडियन अलायन्स पॅरिस’ या संघटनांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

भाटिया यांनी ‘फॉक्स न्यूज डिजिटल’च्या ‘ग्लोबल कॅओस इंक ग्रोज टू १०१ ग्रुप्स’ या अहवालाचा संदर्भ देत नऊ देशांतील १०१ संघटनांचा उल्लेख केला. या संघटना आंदोलनांचे आयोजन, त्यांच्यात समन्वय साधणे किंवा त्यांना प्रसिद्धी देणे अशा कामांत सहभागी असल्याचा अहवालात दावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातून भारतातील आंदोलनांचा आणि विदेशी संघटनांच्या कार्यपद्धतीचा परस्परसंबंध तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech