…तर मराठवाड्यात १५-२० वर्षांत वाळवंट होईल!
मुंबई : दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून बाहेर पडा आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा. जनावरांना चारा मिळण्यासाठी मदत करा, असे आदेशही त्यांनी मनसे नेते, पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत आयोजित मनसे नेत्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा झाल्याचे ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज ठाकरे पुढे म्हणाले, राज्यातील ३२५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. आता दहा दिवसात माहिती येईल. दिवाळीनंतर महाराष्ट्र दौरा करणार आहे. आता दुष्काळग्रस्तांसाठी सरकार उपयायोजना काय करते ते माहीत नाही. आम्ही पक्षाकडून जे करता येणार आहे ते करू. ५ हजारांच्या मदतीने काय होणार आहे. मराठवाड्यासाठी मी सलग २० वर्ष सांगतोय. पाण्याचं नियोजन नाही केलं, वेडंवाकडं पाणी वापरलं तर माझ्याकडे एक अहवाल आहे. तर मराठवाड्यात १५-२० वर्षांत वाळवंट होईल. मराठवाड्याची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अडीचशे तीनशे वर्षे लागतील. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने विचार करतोय. तिकडे बीयरचे कारखाने सुरू असून टॅप वॉटर पाणी विकत आहे. बोअर खोदत आहे. कोणी कसंही पाणी विकलं जातंय.
विचित्र सर्कल आहे. आजपर्यंत या सर्व शेतकऱ्यांना वापरलं गेलं. कामं न करता मतदान होत असेल, शेतकरी चिडत नसेल, लोक चिडत नसेल आणि मतदान होत नसले, तर कशासाठी काम करायची. दुर्लक्ष झालं त्याचं कारण तेच आहे. पाच वर्ष आम्ही बोंब मारत असू आणि निवडणुकीत धर्म आणि जात येत असेल. पैशाच्या पाकिटावर मतदान होत असेल तर कोण लक्ष देईल. मी आता रिपोर्ट आणायला सांगितला. त्यानंतर आम्ही सर्व गोष्टीचा निर्णय घेऊ. कुंभमेळ्याचं. धार्मिक गोष्टींचा विचार केला पाहिजे. पिण्याचे पाणी आणि शेतीची पाणी आहे. हे संकट वाढणार आहे. पाणीच नाही अन्न धान्याची टंचाई वाढणार आहे. तांडेच्या तांडे घरातून बाहेर पडतील. जनावरांचा प्रश्न मोठा आहे. जालन्यात १५ दिवसातून एकदा पाणी येतंय. पाण्याची परिस्थिती नीट होऊ नये. पाण्याचे साठे व्हावेत यासाठी टाक्या बनवणाऱ्या कंपन्यांसाठी सरकार काम करत आहे का. टाक्या लागणारच आहे. १५ दिवसांसाठी त्यासाठी सरकार काम करत आहे का. टँकरचे अदृश्य मालक कोण आहे. यात या लोकांचे लागे बांधे आहेत. पाणी टंचाई झाली तरी चालेल, असेही ठाकरे म्हणाले.