बर्लिन : जगातील अत्यंत लोकप्रिय वेब ब्राउझर आणि मोबाईल गेम ‘स्टिक रन’चे निर्माते तथा प्रसिद्ध जर्मन इन्फ्लुएन्सर मॅन्युएल ओटो यांनी लाइव्हस्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘ट्विच’वर थेट प्रसारणादरम्यान आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. ते अवघ्या 30 वर्षांचे होते. या दुर्दैवी घटनेनंतर ‘स्टिक रन’च्या अधिकृत टीमने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, ट्विच प्रशासनाने त्यांचे चॅनेल आणि संबंधित लाइव्हस्ट्रीम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून तात्काळ हटवला आहे.
मॅन्युएल ओटो यांनी २०१० च्या दशकात किशोरवयात असताना विकसित केलेला ‘स्टिक रन’ हा गेम फेसबुक आणि इतर वेब प्लॅटफॉर्मवर प्रचंड गाजला होता, ज्याचे जगभरात कोट्यवधी सक्रिय खेळाडू होते. त्यांच्या या अकाली आणि धक्कादायक जाण्यामुळे जागतिक गेमिंग जगतात आणि लाखो चाहत्यांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.