BSE इंडिया सेक्टर लीडर्स TRI ट्रॅक करणारा ओपन-एंडेड इंडेक्स फंड
नाशिक : भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे Axis BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड ही त्यांची नवीन फंड ऑफर सादर करण्यात आली आहे. हा एक ओपन-एंडेड इंडेक्स फंड असून तो BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स मधील घटकांमध्ये गुंतवणूक करतो. या फंडाचा एनएफओ २३ जानेवारी २०२६ रोजी सदस्यत्वासाठी खुला होईल आणि ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल. या फंडाचे व्यवस्थापन कार्तिक कुमार (फंड व्यवस्थापक) करणार आहेत. किमान गुंतवणूक रक्कम १०० रु. इतकी आहे. हा फंड गुंतवणूकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा उपाय पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
हा नवीन फंड गुंतवणूकदारांना BSE ५०० इंडेक्स मधील २१ क्षेत्रांमधील भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये व्यापक बाजारातील सहभाग मिळवून देण्यासाठी एक सूज्ञ मार्ग उपलब्ध करून देतो. या फंडातील घटकांमध्ये BSE ५०० इंडेक्स मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक २१ क्षेत्रांमधील सरासरी सहा महिन्यांच्या दैनंदिन एकूण बाजार भांडवलावर आधारित अग्रणी तीन कंपन्यांचा समावेश असेल. यामुळे गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांतील प्रस्थापित बाजारपेठ अग्रणीपर्यंत पोहोच मिळते. हा फंड गुंतवणूकदारांना निर्देशांकातील केवळ प्रबळ क्षेत्रांमध्येच नव्हे तर अर्थव्यवस्थेतील विशेष आणि वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्येही योगदान देण्यास मदत करतो.
फंडाच्या सादरीकरणाबाबत बोलताना अॅक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार म्हणाले, “बाजार विकसित होत असताना गुंतवणूकदार नाविन्यपूर्ण गुंतवणूक उपाय शोधत आहेत. अॅक्सिस म्युच्युअल फंडामध्ये आम्हाला विश्वास आहे की जे उद्योग आपल्या क्षेत्रात आघाडीवर असतात, ते मजबूत मूलभूत घटक आणि लवचिकता दर्शवतात. अॅक्सिस BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड वैविध्यपूर्ण चौकटीद्वारे त्यांच्या स्वतःच्या क्षेत्रातील आघाडीच्या आणि विश्वासार्ह कंपन्यांपर्यंत पोहोचतो. हा फंड गुंतवणूकदारांना भारताच्या विकासाभिमुख अर्थव्यवस्थेत आणि भविष्यात सहभागी होण्याची संधी देईल असा आम्हाला विश्वास आहे.”
फंडाची प्रमुख वैशिष्ट्ये:
• क्षेत्रातील अग्रणी कंपन्यांमध्ये वाटप: विविध क्षेत्रांतील प्रस्थापित कंपन्यांमध्ये व्यापक बाजार सहभाग शोधत असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड डिझाइन करण्यात आला आहे. BSE ५०० इंडेक्स मधून निवड करून, हा फंड २१ क्षेत्रांमधील प्रत्येकी अव्वल तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल. या निर्देशांकातील क्षेत्रांमध्ये वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्र, कमोडिटीज, FMCG, आरोग्यसेवा इत्यादींचा समावेश आहे.
• इंडेक्स संरचना: हा फंड मोठ्या, मध्यम आणि लहान भांडवलाच्या कंपन्यांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक सादर करतो. त्यामुळे एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक करण्यामधील जोखीम कमी होते आणि एखादे क्षेत्र किती लहान मोठे आहे यापेक्षाही योग्य वजन दिले जाते. हा फंड अर्धवार्षिक आधारावर पुनर्रचित केला जाईल. त्यामुळे पोर्टफोलिओचे वेळोवेळी पुनर्संतुलन करता येईल.
• संतुलित जोखीम: या निर्देशांकामध्ये किमान स्टॉक वजन 1% आणि कमाल स्टॉक वजन 5% निश्चित करण्यात आले असून ते तिमाही आधारावर रीसेट केले जाते.
याबाबत भाष्य करताना अॅक्सिस एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) आशिष गुप्ता म्हणाले, “अॅक्सिस BSE इंडिया सेक्टर लीडर्स इंडेक्स फंड साठीची कार्यपद्धती अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की तिचे बेस युनिव्हर्स भारतीय बाजाराच्या संपूर्ण विस्तारातील कंपन्यांचा समावेश करते. प्रत्येक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची सुसूत्रपणे ओळख करून, हा फंड पारदर्शक आणि नियमाधारित पॅसिव्ह पद्धतीद्वारे गुंतवणूकदारांना प्रस्थापित व्यवसायांमध्ये वैविध्यपूर्ण सहभाग पुरविण्याचा प्रयत्न करतो.”