एसबीआय जनरल इन्शुरन्सने पंकज त्रिपाठी यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नियुक्त करत सर्वसमावेशक ब्रँड मोहीम सुरू केली 

0

नाशिक : भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक एसबीआय जनरल इन्शुरन्सने प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांना त्यांचा ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. तसेच, ‘चुनिए भरोसा, अपनों सा’ या सर्वसमावेशक ब्रँड मोहिमेला सुरुवात केली आहे. ही भागीदारी विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला विश्वास आणि पारदर्शकता हाच गाभा असलेल्या ब्रँडशी जोडते. पंकज त्रिपाठी यांचे डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्व त्यांना ब्रँडच्या मुख्य वचनाचे – विश्वासाचे मूर्त स्वरूप बनवते, जे वैयक्तिक आणि आश्वासक वाटते.

आपल्या ‘चुनिए भरोसा, अपनो सा’ मोहिमेचा भाग म्हणून या ब्रँडने एक नवीन आरोग्य विमा फिल्म लाँच केली आहे, जी कुटुंबांच्या सुरक्षेसाठी एक विश्वासार्ह भागीदार ठरण्याच्या त्यांच्या वचनावर प्रकाश टाकते. शांत, दैनंदिन व्यवहारातील काळजी, जबाबदारी, संरक्षण आणि अढळ समर्थन दर्शविणाऱ्या छोट्या-छोट्या, सातत्यपूर्ण गोष्टींमधून खात्री वाटते, या विश्वासावर ही मोहीम आधारित आहे.

या जाहिरातीत पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असून कुटुंबातील एक शांत आणि प्रमुख आधारस्तंभाच्या रुपात त्यांना सादर करण्यात आले आहे. कुटुंबाच्या गरजांशी जुळवून घेणारा, त्यांना प्राधान्य देणारा दैनंदिन कृतींद्वारे त्यांची काळजी व्यक्त करणारा आधारस्तंभ त्यांनी चांगला सादर केला आहे. त्यांची उपस्थिती जबाबदारी, काळजी आणि दृढ वचनबद्धता दर्शवते, हे गुण प्रामुख्याने भारतीय कुटुंबांशी जोडलेले आहेत. जेव्हा कुटुंबांना सर्वाधिक गरज असते तेव्हा आत्मविश्वासाने आणि काळजीने त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या एसबीआय जनरल इन्शुरन्सचे महत्त्व या कथेतून अधोरेखित होते. या जाहिरातीची संकल्पना टीबीडब्ल्यूए लिंटास यांची असून त्यांनीच ती चित्रितही केली आहे.

आजच्या आरोग्यसेवेच्या पार्श्वभूमीवर हे तत्त्वज्ञान अधिकाधिक प्रासंगिक आहे. अनिश्चित वातावरण, वाढता वैद्यकीय खर्च आणि वाढत्या आरोग्य जागरूकतेमुळे व्यापक आरोग्य विमा हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरतो आहे. इन्शुरन्स उत्पादन नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि दाव्याचे पारदर्शक निपटारे करत एसबीआय जनरल या श्रेणीला अधिक अर्थपूर्ण बनवण्यावर लक्ष केंद्रित करते.

या सहकार्याबद्दल एसबीआय जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री. नवीन चंद्र झा म्हणाले, “कुटुंबांची आरोग्यसेवा आणि आर्थिक सुरक्षेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात भारतात स्पष्टपणे बदल होत आहेत. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे आणि वाढत्या आरोग्य जागरूकतेमुळे, व्यापक आरोग्य विमा हा पर्याय नव्हे तर आवश्यकता बनला आहे. ‘चुनिए भरोसा, अपनो सा’ मोहिमेद्वारे आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच्या आमच्या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही भारतीय कुटुंबांच्या वाढत्या गरजांसाठी विमा सोपा, सुलभ आणि प्रतिसाद देणारा बनवण्याची आमची वचनबद्धता अधिक बळकट करत आहोत. त्यासोबतच आरोग्य संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”

एसबीआय जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर श्री. पंकज त्रिपाठी म्हणाले, “जनरल इन्शुरन्स उद्योगातील सर्वात मजबूत ब्रँडपैकी एक असलेल्या एसबीआय जनरल इन्शुरन्सशी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून जोडल्या जाण्याचा मला खूप आनंद आहे. ग्राहकांना संरक्षण देण्याची ब्रँडची अढळ वचनबद्धता आणि ग्राहकांमध्ये असलेला विश्वास मला खरोखरच प्रेरणा देतो. मोहिमेचे ‘चुनिए भरोसा, अपनो सा’ हे हृदयस्पर्शी घोषवाक्य मला फारच भावले. हे एक असे वचन आहे, जे उबदारपणा, जबाबदारी आणि कुटुंब तसेच आपलेपणाच्या अतूट भावनेला प्रतिसाद देते. या जाहिरातीद्वारे, आरोग्य विम्याच्या महत्त्वपूर्ण गरजेबद्दल ब्रँड देशभरात जागरूकता निर्माण करत आहे, यामुळे भारतातील कुटुंबांना सर्वाधिक गरज असताना संरक्षण मिळण्याची खात्री होते.”

एसबीआय जनरल इन्शुरन्सचे मार्केटिंग आणि सीएसआर प्रमुख श्री. रथिन लाहिरी पुढे म्हणाले, “ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून आणि आमच्या जाहिरातीचा नवीन ब्रँड चेहरा म्हणून पंकज त्रिपाठी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होतो आहे. सामान्य माणसातील असामान्य शौर्याचे ही जाहिरात कौतुक करते, जो आपल्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. अगदी तसेच एसबीआय जनरल इन्शुरन्स आरोग्य विम्याद्वारे कुटुंबाना संरक्षण प्रदान करते.”

ही व्यापक सर्वसमावेशक मोहीम प्रिंट, टीव्ही, ओओएच, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाईल. आकर्षक कथाकथन आणि शाश्वत सहभाग उपक्रमांचा वापर करून, कंपनी “चुनिए भरोसा, अपनो सा” ही मोहीम देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवते. ब्रँड रिकॉल मजबूत करण्यासाठी, भावनिक संबंध वाढवण्यासाठी आणि आर्थिक संरक्षणात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून एसबीआय जनरल इन्शुरन्सचे स्थान दृढ करण्यासाठी हा सर्वसमावेशक दृष्टिकोन मांडण्यात आला आहे.

जाहिरात येथे पाहा –

YouTube: https://youtu.be/TUGiZGDf5ew?si=PFcOv03v0qZnyqY_

Instagram: https://www.instagram.com/reel/DVXmM6aiFzk/?igsh=N3FlZ2E5aGNmYWww

Facebook: https://www.facebook.com/share/r/17NYjZTCGf/?mibextid=wwXIfr

X: https://x.com/sbigeneral/status/2028340040972247146?s=46

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech