बिहारमधील मुझफ्फरपूर न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध तक्रार दाखल

0

पाटणा : बिहारमधील निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छठ सणाबद्दल अश्लील टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधींविरुद्ध मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील सुधीर ओझा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये राहुल गांधींवर खटला चालवण्याची आणि अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. वकील ओझा यांनी आरोप केला आहे की, मझौलिया हाटमधील निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, पंतप्रधान मोदी निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करतील आणि निवडणुकीनंतर दिसणार नाहीत. त्यांनी असेही म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी छठ सणावर नाटक करत आहेत.

वकिलाने आरोप केला आहे की, राहुल गांधींच्या विधानामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा खराब करण्याच्या आणि देशाचा अपमान करण्याच्या उद्देशाने असे विधान केले आहे. तक्रारदाराने न्यायालयाला बीएनएसएसच्या कलम २२३ अंतर्गत राहुल गांधींवर खटला चालवण्याची आणि त्यांना अटक करण्याची विनंती केली आहे. २९ ऑक्टोबर रोजी मुझफ्फरपूरमधील साक्रा येथील मजौलिया हाट येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छठ सणाबद्दल अश्लील टिप्पणी केली होती.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech