सीमेवर लावणार अत्याधुनीक रडार प्रणाली

0

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांनंतर, भारतीय लष्कराने उत्तरी आणि पश्चिम सीमेवर अत्याधुनीक रडार प्रणाली बसवण्याची तयारी सुरू केल्याची माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली. हे रडार सिस्टम लष्कराच्या ‘आकाशतीर’ एअर डिफेन्स नेटवर्कशी एकत्रित केले जाईल, जे हवाई हल्ल्यांचा मागोवा घेऊन त्यांना हवेतच नष्ट करेल. लष्कराने यासाठी ४५ लो लेव्हल लाइट वेट रडार (एलएलएलआर-ई) आणि ४८ एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार – ड्रोन डिटेक्टर्स (एडीएफसीआर-डीडी) खरेदीसाठी प्रस्ताव मागवले आहेत. यासोबतच १० लो लेव्हल लाइट वेट रडार (इंप्रूव्ड) साठी देखील प्रस्ताव मागवले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने रात्रीच्या अंधारात भारतावर अनेक ड्रोन हल्ले केले होते. लष्कराने यातील बहुतेक ड्रोन हवेतच पाडले, तरी काही ड्रोन सीमारेषा ओलांडून नागरिक भागांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते. यामुळे आता लष्कराने शत्रुचा पूर्णपणे नाश करण्याचा निर्धार केला आहे.

हा नवा रडार सिस्टम अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त असून, तो कोणत्याही अवघड परिस्थितीत – मग ती डोंगराळ भाग असो, वाळवंट असो किंवा किनारपट्टी शत्रुचा शोध घेऊन त्याचे ट्रॅकिंग आणि नष्ट करण्याचे कार्य करेल. या ऍडव्हान्स रडार सिस्टममध्ये रडार क्रॉस सेक्शनचा (आरसीएस) वापर करून लक्ष्य शोधण्यापासून ते त्याला हवेतच संपवण्यापर्यंतची कार्यक्षमता असेल. हे सर्व रडार आकाशतीर प्रणालीशी जोडले जाणार आहेत, ज्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक गतीमान व अचूक असेल. हा रडार सिस्टम एकाच वेळी १०० लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकतो, आणि त्याची रेंज सुमारे ५० किलोमीटर असेल. त्यामुळे तो डोंगर, रेगिस्तान आणि तटीय भागांमध्येही हवाई हल्ल्यांचा अचूक शोध घेऊ शकतो.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech