डॉक्टरच्या लॉकरमधून एके-47 रायफल जप्त

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-47 रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला शुक्रवारी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, डॉक्टरकडे शस्त्र कसे पोहोचले याचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आदिल अहमद राथर असे असून, तो पूर्वी राजकीय वैद्यकीय महाविद्यालय, अनंतनाग येथे कार्यरत होता. आदिलने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला सहारनपूरमधून अटक केली होती. यानंतर पोलिसांनी शनिवारी अनंतनाग येथील वैद्यकीय महाविद्यालयातील त्याच्या लॉकरची तपासणी केली. या तपासणीत लॉकरमधून एके-47 रायफल सापडल्याने पोलिस अधिकारी देखील थक्क झाले.

दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुलाम काश्मीर व पाकिस्तानमध्ये लपलेल्या काश्मिरी दहशतवाद्यांच्या स्थानिक नेटवर्कवर मोठी कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत पोलिसांनी दहशतवाद्यांचे नातेवाईक व समर्थकांच्या घरांची तसेच काश्मीर खोऱ्यातील विविध तुरुंगांमध्ये बंद दहशतवादी व त्यांच्या ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या बैरकांची तपासणी केली.ही संपूर्ण मोहीम दहशतवाद्यांच्या “आधाररचना प्रणाली” नष्ट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिसांनी संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील सुमारे १११ ठिकाणांची तपासणी पूर्ण केली होती.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech