अकोला : मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना बजेटला मंजूर केली असून शासनाच्या योजनांमधून सर्वोत्तम गांव, शाळा, रस्ते, स्मशानभूमी यासोबतच इतर सगळ्या सुविधांमध्ये जे गाव प्रथम येईल, त्याला बक्षिस देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारने केली. राज्यभरासाठी २५० कोटी रूपयांची ही संकल्पना असून विकासाच्या प्रत्येक टप्पेनुसार विजेत्यांना बक्षिस देण्यात येणार असल्याच ग्रामविकास राज्य मंत्री जयकुमार यांनी म्हंटलय ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते. तर सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या विषयावर बोलताना त्यांनी हिंदी भाषेची सक्ती नसून मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्याचं ते म्हणाले..मात्र यासोबत इतर ही भाषा आपल्या मुलांना आल्या पाहिजे असे ही ते म्हणले.. सध्या मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आणि विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही त्यामुळे निवडणुकीसाठी हा मुद्दा घेऊन काही लोक राजकारण करीत असल्याचंही ते म्हणाले. पावसाळी अधिवेशनावर विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार असल्याची शक्यता आहे, यावर त्यांनी विरोधक आहेच कुठं असे म्हटले आहे.