निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करत आहे – जितेंद्र आव्हाड

0

अकोला : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या वोट चोरीच्या मुद्द्याचं आम्ही स्वागत करतो, असं स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अकोल्यात केलं आहे. निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.येणाऱ्या १५ ऑगस्टला मासांवर बंदी येणार असल्याच म्हणत आव्हाडांनी सरकारवर जोरदार टीका केली. देश आधी वाटला, भाषा वाटली आता खाद्यपदार्थही वाटणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आम्ही हिंदू आहोत पण सनातनी नाही, अशा शब्दांत आव्हाडांनी सरकारवर हल्लाबोल केला..यासोबतच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच सुरू करणार असलेल्या योजनांवरही त्यांनी टिका केली. लाडका नातू, लाडकी सासू, लाडका सासरा अशा योजना सुद्धा राज्य सरकारने आणाव्यात, अशी उपरोधिक टीका आव्हाडांनी केली.मंडळ यात्रेच्या निमित्ताने अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत आव्हाड बोलत होते. आंदोलकांवर सिने स्टाईल लात मारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला बॉलिवूड मध्ये फायटर म्हणून घ्यावा म्हणत या घटनेचा त्यांनी विरोध केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech