अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व – एकनाथ शिंदे

0

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विरोधी पक्षनेते दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट अखेरीस संपणार असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवे यांच्या यांच्या राजकीय कार्याचे आणि संघर्षमय वाटचालीचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अंबादास दानवे हे मराठवाड्याचे अस्सल प्रतिनिधी असून, जनतेच्या वेदना ज्या तडफेने त्यांनी मांडल्या, ती उदाहरणार्थ ठरेल. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद केवळ निभावले नाही, तर त्या भूमिकेला जिवंत ठेवले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech