अंबादास दानवे यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

0


छत्रपती संभाजीनगर / मुंबई : गणेश उत्सवानिमित्त आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईतील लालबागचा राजाचे मनोभावे दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या जीवनात सुख आणि शांती लाभू दे, अशी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली. मुंबईतील लालबागचा राजा जगप्रसिद्ध असून दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी नेहमीच होते. गणेशोत्सव काळात गर्दीचा उच्चांक देखील पहावयास मिळतो. अनेक भाविक आपले नवस बोलण्यासाठी आणि सोडण्यासाठी त्याचे येतात. लालबागचे दर्शन व्हावे यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. अंबादास दानवे यांनी आज मुंबईतील लालबाग राजा गणपतीचे दर्शन घेतले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech