अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडातर्फे अ‍ॅक्सिस मल्टी-अॅसेट अ‍ॅक्टिव्ह फंड ऑफ फंड सादर

0

गतिशील अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनसाठी सर्वोत्तम सुविधा  

नाशिक : भारतातील अग्रगण्य मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडतर्फे अ‍ॅक्सिस मल्टी-अॅसेट अ‍ॅक्टिव्ह फंड ऑफ फंड (FoF) ही ओपन-एन्डेड फंड ऑफ फंड योजना सादर करत असल्याचे जाहीर करण्यात आले. ही योजना इक्विटी-आधारित आणि डेब्ट आधारित म्युच्युअल फंड योजनांच्या युनिट्समध्ये तसेच कमोडिटी-आधारित ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. न्यू फंड ऑफर (एनएफओ) 21 नोव्हेंबर 2025 रोजी सबस्क्रीब्शनसाठी खुले होईल आणि 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.

अ‍ॅक्सिस मल्टी-अॅसेट अ‍ॅक्टिव्ह FoF गुंतवणूकदारांना बहु-अॅसेट विविधीकरणासाठी एकच विंडो सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आले असून त्यात इक्विटी, डेब्ट, सोनं आणि चांदी या सर्वांमध्ये सुव्यवस्थितपणे व्यवस्थापित पोर्टफोलिओद्वारे गुंतवणूक करता येते. ही योजना विविध अॅसेट वर्गांमध्ये आणि गुंतवणूक विषयांमध्ये गतिमान वाटप करून दीर्घकालीन भांडवली वृद्धी साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवते. यासाठी मजबूत परिमाणाधारित संख्यात्मक मॉडेल आणि अंतर्गत समितीचे मार्गदर्शन घेतले जाते. या पद्धतीमध्ये मूल्यांकन, व्यापक आर्थिक संकेत निर्देशक, बाजारातील प्रवाह, कमोडिटी घटक यांचा विचार केला जातो तसेच भूराजकीय घडामोडी आणि बाजारातील अपेक्षांतील बदल यांसारख्या मोजता न येणाऱ्या घटकांचाही समावेश असतो.

फंड ऑफ फंड रचना का? फंड ऑफ फंड रचना गुंतवणूकदारांना अनेक महत्त्वाचे फायदे देते. ही रचना एका फंड व्यवस्थापकावर किंवा एका गुंतवणूक शैलीवर अवलंबित्व कमी करते आणि कर परिणाम न होता जलद व कार्यक्षम पुनर्संतुलन करण्यास सक्षम करते. यामुळे प्रत्येक अॅसेट वर्गातील विस्तृत संधींचा लाभ घेता येतो आणि बदलत्या बाजारचक्रांमध्ये कार्यक्षम कामगिरी करण्याची क्षमता वाढते.

या रचनेचा उपयोग करून, ॲक्सिस मल्टी-अॅसेट अ‍ॅक्टिव्ह FoF विविध गुंतवणूक विषयांमध्ये गतिशील बदल करू शकतो आणि अधिक कार्यक्षम वाटप करू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांवर अतिरिक्त करभार पडत नाही. हे दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे अधिक लवचिक व कार्यक्षम साधन ठरते.

सादरीकरणाबद्दल बोलताना ॲक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार म्हणाले, “ॲक्सिस म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सक्षम करणारी नाविन्यपूर्ण उपाययोजना देण्यास वचनबद्ध आहे. या प्रयत्नात, ॲक्सिस मल्टी-अॅसेट अ‍ॅक्टिव्ह FoF हे विविध उत्पादने व्यवस्थापित करण्याच्या गुंतागुंतीशिवाय वैविध्य शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक सर्वसमावेशक सुविधा आहे. इक्विटी, डेब्ट आणि कमोडिटीजना गतिमानपणे व्यवस्थापित रचनेत एकत्र करून आम्ही गुंतवणूकदारांना बाजारातील चक्रे प्रभावीपणे समजून घेण्यास, अस्थिरता कमी करण्यास आणि जोखीम-समायोजित परतावे सुधारण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.”

अधिक माहिती देताना ॲक्सिस एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आशीष गुप्ता म्हणाले, “अॅसेट वाटप हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे मूळ तत्त्व आहे, परंतु बाजाराची वेळ साधणे आणि अॅसेट वर्गांमध्ये बदल करणे बहुतेक गुंतवणूकदारांसाठी आव्हानात्मक असते. ॲक्सिस मल्टी-अॅसेट अ‍ॅक्टिव्ह FoF याद्वारे आम्ही एक शिस्तबद्ध, मॉडेल-आधारित दृष्टिकोन आणत आहोत. त्यात परिमाणाधारित माहिती आणि सक्रिय दृष्टीकोन यांचे मिश्रण आहे. यामुळे आम्हाला इक्विटी, डेब्ट आणि कमोडिटीजमधील संधी योग्य वेळी पकडता येतात आणि जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करता येते. आमचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांना सुसंगत गुंतवणूक अनुभव आणि वेळोवेळी सातत्यपूर्ण, स्थिर परिणाम देणे आहे.”

आता गुंतवणूक का करावी?

सध्याची बाजारातील परिस्थिती हे वाढत्या अस्थिरतेने आणि बदलत्या जागतिक परिस्थितींनी व्यापलेली आहे. मागील दोन वर्षांत इक्विटी बाजारांनी मजबूत परतावे दिले असले तरी चालू वर्ष बऱ्यापैकी अस्थिर राहिले आहे आणि काही विभागांमध्ये मूल्यांकन जास्तच राहिले आहे. दुसरीकडे, डेब्ट बाजारात स्थिर व्याजदरांचे वातावरण व सामान्यीकृत तरलता दिसत आहे.

त्याच वेळी भूराजकीय अनिश्चितता आणि चलनातील चढउतार यामुळे सोनं आणि चांदी यांसारख्या सुरक्षित कमोडिटीजचे आकर्षण वाढले आहे. अशा परिस्थितीत, फक्त एका अॅसेट वर्गावर अवलंबून राहणे गुंतवणूकदारांसाठी धोकादायक ठरू शकते.

बहु-अॅसेट दृष्टिकोन एक संतुलित उपायसुविधा सादर करतो — इक्विटीमधून वाढीची क्षमता, डेब्टमधून स्थैर्य आणि कमोडिटीजमधून संरक्षण. ॲक्सिस मल्टी-अॅसेट अ‍ॅक्टिव्ह FoF एक शिस्तबद्ध, मॉडेल-आधारित अॅसेट वाटप धोरण वापरतो. त्यामुळे या सर्व अॅसेट वर्गांमध्ये गतिमान समायोजन करता येते. यामुळे गुंतवणूकदारांना नव्या संधींचा लाभ घेता येतो आणि अस्थिर जागतिक व स्थानिक आर्थिक परिस्थितीत जोखीम कमी करता येते.

हा फंड किमान दोन वर्षांच्या गुंतवणूक कालावधी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे. किमान गुंतवणूक रक्कम 100 रु. आहे आणि त्यानंतर 1 रु. च्या पटीत गुंतवणूक करता येते. हा फंड श्री. देवांग शाह, श्री. श्रेयश देवलकर, श्री. आदित्य पगारिया आणि श्री. मयंक ह्यान्की यांच्या व्यवस्थापनाखाली राहील.

अ‍ॅक्सिस मल्टी-अॅसेट अ‍ॅक्टिव्ह फंड ऑफ फंडचे ठळक मुद्दे

• वर्ग: हायब्रीड FoF (स्थानिक)

• बेंचमार्क: NIFTY 500 TRI (45%), NIFTY काम्पोझीट डेब्ट इंडेक्स (45%), प्रत्यक्ष सोन्याची स्थानिक किंमत (5%), प्रत्यक्ष चांदीची स्थानिक किंमत (5%)

• NFO कालावधी: 21 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2025

• फंड व्यवस्थापक: श्री. श्रेयश देवलकर, श्री. देवांग शहा, श्री. मयंक ह्यान्की, श्री. आदित्य पगारिया

• किमान गुंतवणूक रक्कम: 100 रु. आणि त्यानंतर 1/- रु. च्या पटीत

• एक्झिट लोड: अ‍ॅलॉटमेंट दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत रिडीम किंवा स्विच आउट केल्यास:

गुंतवणुकीच्या 10% : उर्वरित गुंतवणुकांवर काही नाही: 1%. अ‍ॅलॉटमेंट दिनांकापासून 12 महिन्यांनंतर रिडीम किंवा स्विच आउट केल्यास: NIL

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech