देशव्यापी भारत बंदची हाक; २५ कोटी कामगार सहभागी

0

मुंबई : केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरात ९ जुलै रोजी मोठा संप पुकारण्यात येणार आहे. १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांचे सहकारी घटक मिळून हा ‘भारत बंद’ आयोजित करत असून, यामध्ये २५ कोटींहून अधिक कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपात बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, रस्ते, सार्वजनिक वाहतूक, औद्योगिक क्षेत्र, बांधकाम अशा विविध महत्त्वाच्या क्षेत्रातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे देशभरात अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कशावर होणार परिणाम? : हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंह सिद्धू यांनी सांगितले की, “हा संप देशातील सामान्य सेवांवर मोठा परिणाम करेल. नागरिकांना यामुळे बँकिंग, टपाल सेवा, सार्वजनिक वाहतूक, कोळसा उद्योग आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.”

शेअर व सराफा बाजार : शेअर बाजार आणि सराफा बाजार उद्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील. संपास शेतकरी आणि ग्रामीण मजुरांचा पाठिंबा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर यांनी माहिती दिली की, एनएमडीसी लिमिटेड, खनिज व इस्पात कंपन्या, राज्य सरकारांचे विविध विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी देखील संपात सामील होतील. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी मजूर संघटनांनीही या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

कामगार संघटनांच्या प्रमुख मागण्या: गेल्या १० वर्षांत एकदाही वार्षिक कामगार परिषद बोलावली नाही चार नव्या कामगार संहितांमुळे मजुरांचे हक्क डावलले गेले संपाचा हक्क, संघटनात्मक स्वातंत्र्य, सामूहिक करार यांना धोका वाढती बेरोजगारी, महागाई आणि मजुरीतील घट खाजगीकरण, आउटसोर्सिंग आणि ठेका पद्धतीला सरकारचा प्रोत्साहन सरकारवर थेट आरोप कामगार संघटनांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे की, सरकार फक्त उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून, कामगारांचे हित बाजूला टाकले जात आहे. ६५% लोकसंख्या ३५ वर्षांखालील असूनही रोजगाराच्या संधी निर्माण न करता निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नेमणूक देण्यास प्राधान्य दिले जात आहे.

संपामागील उद्देश : कामगार संघटनांनी स्पष्ट केलं आहे की, हा भारत बंद केवळ विरोध नाही, तर सरकारला जागं करण्याचा प्रयत्न आहे. मागण्या मान्य करून कामगार कायदे सुधारण्यात यावेत, रोजगार वाढवावा आणि खाजगीकरणाच्या धोरणावर पुनर्विचार करावा, असा ठाम आग्रह संघटनांचा आहे. कोणत्या संघटना या देशव्यापी संपात सहभागी होणार? या भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या प्रमुख कामगार संघटनांमध्ये पुढील संघटनांचा समावेश आहे. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन (आयएनटीयूसी) ऑल इंडिया ट्रेड युनियन (एआयटीयूसी) हिंद मजदूर सभा (एचएमएस) सेन्टर ऑफ इंडिया ट्रेड युनियन्स (सीआययू) ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेन्टर (एआययूटीयूसी) ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेन्टर (टीयूसीसी) सेल्फ-एम्प्लॉयड विमेन्स असोसिएशन (एसईडब्ल्यूए) ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स (एआयसीसीटीयू) लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन (एलपीएफ) युनायटेड ट्रेड युनियन (यूटीयूसी)देशभरातील नागरिकांना ९ जुलैच्या दिवशी काही सेवा बंद राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech