नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेवरुन वादंग उठले आहे. मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त मेळ्याव्यानंतर तर हा वाद आणखीनच वाढला आहे. अनेक उत्तर भारतीय नेत्यांनी या वादावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.यानंतर आता भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी या मुद्द्यावरुन राज ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. भाजप नेने बृजभूषण यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान देताना म्हटले की, ‘भाषा तोडण्याचे नाही, तर जोडण्याचे काम करते. मी राज ठाकरेंना सांगू इच्छितो की, तुमच्या या कृतीमुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश किंवा उत्तर भारतीयांचे नाते तुटणार नाही. तुम्ही वाचले पाहिजे, तुम्ही कदाचित लिहित-वाचत नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केले होते, तेव्हा आमच्या आग्रा व्यापाऱ्यांनी त्यांना तुरुंगातून मुक्त करण्याचे काम केले.
आज ज्या गोष्टीचा तुम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाच्या इतिहासात उत्तर भारतीयांनी घाम गाळला आहे. आज अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहात. जेव्हा त्यांनी अयोध्येत येण्याची योजना आखली होती, तेव्हा मी त्यांना येऊ देणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळेच आता त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. राज ठाकरे, शुद्धीवर या. उत्तर भारतातील तरुण इतके संतापले आहेत की, जर एखाद्या मोठ्या व्यक्तीने आव्हान केले, तर ते सगळे तुमच्या दिशेने येतील. ते तुम्हाला सहन होणार नाही. म्हणूनच मी म्हणतोय की, राजकारण करा, पण भाषा, पंथ, जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करू नका,’ अशा शब्बात बृहभूषण यांनी सुनावले.