इगतपुरीत रिसोर्टमध्ये चालणाऱ्या कॉल सेंटरवर सीबीआयचा छापा

0



इगतपुरी : इगतपुरी येथील एका रिसोर्ट मधून विदेशी नागरिकांना फोन करून लुटण्याची घटना होत असल्याचे सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर समोर आले आहे याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नासिक मधील इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट त्या ठिकाणी काही व्यक्तींनी जागा भाड्याने घेतली होती त्या ठिकाणी ॲमेझॉन सपोर्ट सर्विसेस नावाचे कॉल सेंटर उभारून तो कॉल सेंटरच्या माध्यमातून बनावट फोन करून अमेरिका कॅनडा व इतर देशातील नागरिकांची गिफ्ट कार्ड क्रिप्टो करेन्सी द्वारे फसवणूक होत होती. सर्व करण्यासाठी या ठिकाणी ६२ कर्मचारी लाईव्ह पद्धतीप्रमाणे काम करत होते. सातत्याने नागरिकांना फोन करून गिफ्ट कार्ड व क्रिप्टो करेन्सी मध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून फोन केले जात होते.

काही दिवसापासून सातत्याने सायबर गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढत आहे त्याबरोबरच विदेशातील नागरिकांना भारतामधील बोगस कॉल सेंटर मधून फोन करून फसवणूक करण्याचे प्रमाण देखील वाढू लागल्यामुळे याबाबतच्या तक्रारी देखील सातत्याने दाखल होत आहेत. याबाबतचा एक गुन्हा शुक्रवारी सीबीआयकडे दाखल झाला होता तक्रार करणाऱ्या फिर्यादीने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केलेली होती. यामध्ये सहा खाजगी व्यक्ती आणि एक बँक अधिकारी सहभागी असल्याचे फिर्यादीने म्हटलेले होते त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा तपास करत असताना सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील रेन फॉरेस्ट रिसॉर्ट या ठिकाणी खाजगी व्यक्तींनी जागा भाड्याने घेऊन कॉल सेंटर चालविले जात असल्याचे समजले होते.

त्या आधारे या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी ६० ऑपरेटर यांची नियुक्ती असल्याचे समोर आले तसेच ४४ लॅपटॉप ७१ मोबाईल यासह गुन्हेगारी स्वरूपाच्या डिजिटल पद्धतीने जो वापर केला जातो त्याबाबतचे पुरावे देखील मिळाले असून या ठिकाणी १.२० कोटी रुपयांची रोकड पाचशे ग्रॅम सोनं एक कोटी रुपयांच्या सात लक्झरी कार अंदाजे पाचशे रुपये म्हणजेच विदेशी चलनामध्ये पाच लाख रुपयांची क्रिप्टो करन्सी यासह २००० कॅनेडियन डॉलर चेक गिफ्ट व्हाउचर अंदाजे त्याची भारतीय रक्कम ही १.२६ लाख रुपये आहे. एवढे सर्व साहित्य सीबीआयने रविवारी टाकलेल्या छाप्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे हे सर्व आरोपी मुंबई येथील असून सीबीआय या प्रकरणी अधिक तपास करीत आहे

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech