आत्मनिर्भरतेसाठी गुंतवणूकदार शिक्षण आणि सहभागात नावीन्य आणण्यासाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित करत सीडीएसएलने केली आयडीयाथॉनची सुरुवात

0

ठाणे  : आशियातील पहिली सूचीबद्ध डिपॉझिटरी आणि 16.7 कोटींहून अधिक डी-मॅट खात्यांची विश्वासार्ह संरक्षक असलेली सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने (“सीडीएसएल”) विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आव्हानात्मक उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पहिले आयडीयाथॉन लाँच केले आहे. सीडीएसएलच्या वार्षिक रीइमॅजिन चर्चासत्राच्या तिसऱ्या आवृत्तीअंतर्गत पुनर्कल्पना आयडीयाथॉन हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

भारतातील शिकण्याच्या, गुंतवणूक करण्याच्या आणि वाढीच्या पद्धतीत बदल घडवून आणतील अशा उपाययोजना डिझाइन करण्यात तरुण नवोन्मेषी मनांना गुंतवून ठेवणे हे आयडीयाथॉनचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून बाजारातील सहभाग अधिक जबाबदार आणि समावेशक होईल.

21 कोटींहून अधिक गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यांच्या मालमत्तेचे डिपॉझिटरी संरक्षण इकोसिस्टम करते. सिक्युरिटीज मार्केटमधील सहभाग आणखी वाढवण्याची तसेच नागरिकांना याचा फायदा घेण्यापासून रोखणाऱ्या अडथळ्यांना धोरणात्मकरित्या तोंड देण्याची मोठी क्षमता यात आहे.

अधिकाधिक लोकांना आर्थिक क्षेत्रात आणण्यासाठी, त्यांचे दृष्टिकोन समजून घेण्यासाठी तसेच त्यांनी योगदान द्यावे यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सीडीएसएल तरुण नवोन्मेषकांना प्रोत्साहन देत आहे. सेबी आणि आरबीआय सारख्या नियामकांच्या समान उपक्रमांवर त्यांचे उपक्रम आधारित आहेत.

गुंतवणूकदारांचे शिक्षण वाढवून आणि मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक तसेच जबाबदार सहभाग वाढवून बाजारपेठेतील प्रवेशाचे लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न करतो. यातील सहभागी त्यांना आवडेल त्या मार्गांचा वापर करून उपाय शोधू शकतात. मग ते गेमिफिकेशन, वातावरणीय बदल, संवाद, डिझाइन, तंत्रज्ञान किंवा समुदाय-बांधणी, असे कोणतेही असोत. मात्र या उपायांमध्ये सक्षमीकरण, समावेशन आणि विश्वास या तीन प्रमुख तत्त्वांचा समावेश व्हायला हवा.

“पुनर्कल्पना आयडीयाथॉन हा एक जबाबदार नवनिर्मितीचा उत्सव आहे. सतत विकसित होत असलेल्या मार्केट लँडस्केपमध्ये, तंत्रज्ञान हे एक उत्प्रेरक आणि विश्वासाचे फ्लायव्हील म्हणून काम करते जे गुंतवणूकदारांना योग्य साधने आणि अंतर्दृष्टी देऊन सक्षम करते. सिक्युरिटीज मार्केट अंतर्ज्ञानी, सर्वसमावेशक आणि प्रत्येक गुंतवणूकदारासाठी प्रवेशयोग्य असणे आवश्यक आहे. हे आयडीयाथॉन राष्ट्र उभारणीचे तसेच आत्मनिर्भर गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन भक्कम करण्याची सीडीएसएलची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. सगळ्या गोष्टींची माहिती असलेला गुंतवणूकदार हा सुरक्षित गुंतवणूकदार आहे, जो त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारे निर्णय घेण्यास सक्षम आहेआपले भविष्य घडवण्याच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो,” असे श्री. नेहल व्होरा, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सीडीएसएल म्हणाले.

आयडीयाथॉनमध्ये नावीन्य आणि सर्जनशीलतेसाठी एकूण ₹11.5 लाखांचे बक्षीस दिले जाईल. विजेत्या कल्पनेसाठी ₹5 लाख, उपविजेत्यांना ₹3 लाख आणि ₹2 लाख तर चौथ्या आणि पाचव्या स्थानासाठी प्रत्येकी ₹75,000, अशी बक्षिसे दिली जातील.

आयडीयाथॉन 2025 साठी 17 नोव्हेंबर 2025 रोजी नोंदणी खुली होईल. एका संघात चार विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक (एकाच संस्थेतील) सहभागी होऊ शकतात. प्रॉब्लेम स्टेटमेंट, मूल्यमापन आणि टाइमलाइनसंबंधातील अधिक तपशील https://ideathon.cdslindia.com/ येथे उपलब्ध आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech