मुख्यमंत्र्यांकडून लातूरला २९१ कोटी आणि जिल्हा रुग्णालय

0

लातूर : लातूरच्या पाणीपुवठा योजना व त्यासाठी २९१ कोटी मंजूर आणि लातूरचा जिल्हा रुग्णालय या दोघांनाही मान्यता दिल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवकेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. भारतीय जनता पक्षाचे कार्य तळागाळातील सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणारे लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री . देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषद प्रांगणात संपन्न झाला.भारतीय जनता पक्षाला राज्यात सर्व सामन्यांचा पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचे खरे श्रेय हे स्व. मुंडे साहेबांना जाते. पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचवणे असो वा विधानभवनात विरोधकांची बोलती बंद करून त्यांना हैराण करून सोडणे असो सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंत ताकदीने पेलेल्या. आपल्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला गुंडाराजपासून मुक्त करत, खऱ्या अर्थाने एका निर्भय व सशक्त महाराष्ट्राच्या निर्माणाची सुरुवात त्यांनीच केली, अशी भावना , मुख्यमंत्री महोदयांनी या प्रसंगी व्यक्त केली. त्याचबरोबर लातूरच्या पाणीपुवठा योजना व त्यासाठी २९१ कोटी मंजूर आणि लातूरचा जिल्हा रुग्णालय या दोघांनाही मान्यता दिल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी केली.

याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे, आ. रमेशअप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, आ. संजय केणेकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप जी, जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे , पोलीस अधीक्षक अमोली तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महापालिका आयुक्त मानसी, भाजपा जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरुमकर, शहर जिल्हाध्यक्ष अजिजी पाटील कव्हेकर, माजी आमदार शिवाजीरावी पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंदण्णाजी केंद्रे, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा होनराव, शैलेश गोजमगुंडे, माजी जि.प. अध्यक्ष मिलिंद लातुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech