नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी सध्या भारत दौऱ्यावर असून, मंगळवारी (१९ ऑगस्ट) त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये आता सुधारणा होत असून सीमेवर स्थिरता पुन्हा प्रस्थापित होत आहे. ही सुधारणा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि एनएसए अजित डोभाल यांच्यात झालेल्या भेटीत स्पष्टपणे दिसून आली.
चिनी परराष्ट्र मंत्र्यांनी या भेटीदरम्यान सांगितले की, “आता सीमांवर स्थिरता प्रस्थापित झाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे.” त्यांनी हेही म्हटले की, “भारत–चीन संबंधांमध्ये सुधारणा घडवण्याचा हा योग्य काळ आहे, ज्यामुळे दोन्ही देशांच्या विकासास गती मिळेल. वांग यी म्हणाले, “गेल्या वर्षाच्या शेवटी विशेष प्रतिनिधींमधील २३ व्या फेरीतील चर्चा अत्यंत सकारात्मक ठरली. त्या बैठकीत आम्ही मतभेद दूर करण्यासोबत सीमांवरील स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी एकमत साधले होते, जे फार महत्त्वाचे ठरले. आपण काही विशिष्ट उद्दिष्टेही निश्चित केली होती. याचा आनंद आहे की आता प्रत्यक्षात सीमांवरील स्थिरता पुन्हा प्रस्थापित झाली आहे.”
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी एनएसए अजित डोभाल यांची प्रशंसा करत म्हटले, “मी भारतीय प्रतिनिधी म्हणून आपल्या (डोभाल) यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतो. आता द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा आणि विकासासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आपल्यासमोर आहे.” अमेरिकेपासून अंतर राखणाऱ्या परिस्थितीत चीन भारताच्या अधिक जवळ येत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर नाराज आहेत.त्यामुळे भारत–चीन संबंधांतील सुधारणा अधिक महत्त्वपूर्ण ठरू शकतात.रशियाकडून भारताने तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प नाराज झाले असून, या प्रकरणावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.याच कारणामुळे ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लागू केला आहे.