मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकाकडून ५१ कोटींचे कोकेन जप्त

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएम आयए) सीमा शुल्क विभागाने कारवाई करत एका परदेशी नागरिकाकडून तब्बल ५१.९४ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ५१.९४ कोटी रुपये असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) ने सोमवारी ही कारवाई केली आहे. या कारवाईत संशयित परदेशी नागरिकाची वैयक्तिक झडती घेतली असता, त्याच्या शरीरावर परिधान केलेल्या ऑर्थो कमरपट्टा आणि पायांवर लावलेल्या पट्ट्यांमध्ये लपवलेली चार पॅकेट्स सापडली. पांढऱ्या रंगाच्या त्या पदार्थाची तातडीने चाचणी करण्यात आली.

नारकोटिक फील्ड टेस्टिंग किटने केलेल्या तपासणीत त्या पदार्थात कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आरोपीस अंमली पदार्थ नियंत्रण कायदा (एनडीपीएस कायदा,१९८५) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाने याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून, या कोकेन तस्करीमागे कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळी किंवा सिंडिकेटचा शोध घेतला जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech