दिव्यांगांना स्टॅाल न दिल्याने महानगरपालिका आयुक्त दालनाला टाळा ठोकत काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा

0

उल्हासनगर : दिव्यांगांना स्टॅाल न दिल्याबाबत १७/१०/२०२५ रोजी महानगरपालिकेच्या आयुक्त दालनाला टाळा ठोकत काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाने घेतला आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील दिव्यांगबांधवांना स्टॅाल मिळणेबाबत मागील १ वर्षांपेक्षा अधिक कालावधी पासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पत्रव्यवहार, पाठपुरावा करण्यात आला तरी सुद्धा दिव्यांग कल्याणकारी विभाग व सदर विभागाचे अधिकारी फक्त आश्वासणे देऊन दिव्यांगांच्या तोंडाला पाने पूसण्याचे काम करीत असल्याचे त्यांच्या या ढिसाळपणा वरून सिद्ध झाले. त्यांच्या या निर्णयाचा विरोध म्हणून उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त दालनाला टाळा ठोकत काळी दिवाळी साजरी करणारा असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल दिलीप पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

उल्हासनगर महानगरपालिकेतील दिव्यांग काठी भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. सदर घोटाळ्यात सर्व अधिकारी वर्ग सामील असून देखील एकाही अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेला नाही. तसेच दिव्यांग कायदा २०१५ अनुसार दिव्यांगांच्या निधीचा अपहार करणे हा एक गुन्हा असून दिव्यांग कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद होणे आवश्यक असतांना महानगरपालिकेकडून दिव्यांग काठी घोटाळ्यातील दोषींवर अद्याप पर्यंत गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. एकंदरीतच दिव्यांगांप्रती उल्हासनगर महानगरपालिका असंवेदनशील असून त्यांचे प्रश्न सोडवण्याप्रती निरूत्साही व बेजबाबदारपणे वागत असल्याचे निदर्शणास येत आहे. याकरीता वरील सर्व मागण्यांसहीत आम्ही सर्व दिव्यांगबांधव उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाला टाळा ठोकत काळी दिवाळी साजरी करणार इशारा प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हा वतीने देण्यात आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech