सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा

0

जळगाव : सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात आज २९ मे रोजी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा ४४० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर दररोज निश्चित केले जातात. सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, ज्यात डॉलरच्या किमतीतील चढ-उतार, कच्च्या तेलाच्या किमती आणि विनिमय दर यांचा समावेश आहे. दरम्यान आज सोने दरात घसरण झाली आहे यानंतर आज २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा ९७,०४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७७,६३२ रुपये आहे. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील घसरण झाली आहे. १ तोळा सोने ८८,९५० रुपयांवर विकले जात आहे. आज या दरात ४०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,१६० रुपये आहे. चांदीच्या दरात जास्त बदल झालेले नाहीत. आज १० ग्रॅम चांदी ९९९ रुपयांवर विकले जात आहे. तर १०० ग्रॅम चांदीची किंमत ९९९०० रुपये आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech