वामन म्हात्रे प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त साखर, रवा, मैद्याचे वाटप

0

(दत्ता भाटे)

कल्याण : वामन म्हात्रे प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त लोकोपयोगी साखर, रवा, मैदा वाटप उपक्रमाचे भव्य आयोजन गरीबाचावाडा, डोंबिवली पश्चिम येथे करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे प्रमुख शिवसेना डोंबिवली उपशहरप्रमुख गोरखनाथ म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे, युवासेना डोंबिवली उपशहर अध्यक्ष अनमोल म्हात्रे, समाजसेविका अश्विनी म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, माजी नगरसेविका कविता म्हात्रे, रसिका पाटील आणि संदेश पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते साखर, रवा, मैद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मिहिला जिल्हा संपर्क संघटक कविता गावंड आणि केतकी पवार यांसह इतर अनेक मान्यवर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

तसेच या उपक्रमात खास आकर्षण म्हणजे १००० लाडक्या बहिणींसाठी लकी ड्रॉ तसेच भावांसाठी ५०० लकी ड्रॉ चे आयोजन करून दिवाळीच्या उत्सवाला बंधुभावाचा आणि आनंदाचा अनोखा स्पर्श देण्यात आला. साखर, रवा आणि मैद्याचे वाटप करून नागरिकांच्या घरगुती गरजांची पूर्तता करण्यात आली. या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत, या उपक्रमाद्वारे दिवाळीत प्रत्येक घरात माणुसकीचा आणि आनंदाचा दिवा पेटविण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech