नाशिक : राज्यातील सामाजिक ऐक्य कायम राहिलं पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे . सरकार हे कोणत्या जाती धर्माचे नसते त्यांनी समाजासाठी काम केलं पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक दिवसाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी नाशिकमध्ये आलेले पक्षाध्यक्ष शरद पवार हे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक ऐक्य हे एक वैशिष्ट्य आहे त्याची जपणूक केली पाहिजे. पण आज प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले की, समाजात कटूता उभा निर्माण होत आहे आणि त्यामुळे सामाजिक ऐक्याला मोठा तडा केला आहे असं मत व्यक्त करताना म्हणाले की, सरकारने घेतलेली भूमिका ही योग्य वाटत नाही कारण एका समाजासाठी वेगळा दुसऱ्या समाजासाठी वेगळं अशा स्वरूपाचे काम करणे हे सरकारचं काम नाही याकरता सरकारने सामाजिक ऐक्य कसे राहावे कसे टिकावे या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूर दौऱ्यावरती गेले त्यावरती बोलताना म्हणाले की, तिकडच्या लोकांची मागणी होती म्हणून पंतप्रधान गेले ते चांगलं झालं आहे .तर भारत पाकिस्तान मॅच च्या संदर्भामध्ये बोलताना ते म्हणाले की, एकच दिवसाचा विषय आहे नंतर पुढे यावर बोलू असे सांगून त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. तर मनोज जरांगे यांच्या प्रश्नाबाबत बोलताना शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली की ज्यांचा आमचा काही संबंध नाही त्यांच्याविषयी बोलणे मला तरी योग्य वाटत नाही त्यामुळे त्यावर काहीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नाही. तर छगन भुजबळ यांच्या भूमिके विषयी बोलताना देखील शरद पवार म्हणाले की, एका समाजाची बाजू घेऊन राजकारण करणे सोबत नाही व्यापक हेतू हवा आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे समाजाच्या अडचणी सोडवणे हे सर्वांचच काम आहे असेही ते म्हणाले.