
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट म्हणून दिली. तसेच केंद्र आणि राज्यातील अनेक विषयावर सकारात्मक चर्चा केली. यावेळी मोदी यांनी एनडीए मधील सर्व घटक पक्ष हे विचाराने जोडले गेलेले असून पक्ष ही आघाडी अशीच भक्कम रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच संपूर्ण शिंदे कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.