
कल्याण : अत्यंत अवघड व कठिण श्रेणीत गणला जाणारा तैलबैला किल्ला कल्याण येथील सुप्रसिद्ध गिर्यारोहक भूषण पवार यांनी यशस्वीपणे सर केला आहे. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासुन उंची तब्बल 3 हजार 332 फुट इतकी आहे.250 फूट प्रस्तर भिंतीवर प्रस्तरारोहण गिर्यारोहक भूषण पवार यांनी केले. हा किल्ला पुणे जिल्ह्यात येत असला तरी सुधागड तालुक्याच्या सीमेवर आणि सुधागड किल्ल्याच्या अगदी समोर आहे.
कल्याण येथे राहत आलेले प्रसिद्ध गिर्यारोहक व प्रस्तरारोहक भूषण पवार आणि हिम ऑर डील संघाचे चेतन शिंदे यांनी या मोहिमेचे आयोजन व नेतृत्व केले होते. गिर्यारोहणाची आवड असलेल्या आणि कल्याण गिर्यारोहक संघाचे अध्यक्ष असलेल्या भूषण पवार ह्यांनी गिर्यारोहणाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन आपली आवड जोपासत आजवर अनेक सुळके व गड आकिल्ले सर केले आहेत.
या डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी गरजेचे सामान व गिर्यारोहणाच्या तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे.अली,श्वेताली गुल्हाने,सिमरन अगरवाल यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.