पुडुचेरीची : कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल), कोची द्वारे बांधण्यात येणाऱ्या आठ ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स’ (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) पैकी पहिले जहाज ‘माहे’ भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले. केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीमधील ऐतिहासिक बंदराचे नाव दिलेले ‘माहे’ भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहे. नौदल जहाजबांधणीमध्ये भारत वेगाने स्वावलंबी होत असून ‘माहे’ त्याचे एक प्रतिबिंब आहे आणि सीएसएलने या जहाजाची स्वदेशी पद्धतीने रचना आणि निर्मिती केली आहे. उथळ पाण्याखाली देखरेख, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा (लिमो), पाणबुडी विरोधी युद्धासाठी (एएसडब्ल्यू) सुसज्ज आहे आणि त्यात प्रगत ‘माइन लेइंग’ क्षमता आहे. जवळपास ७८ मीटर उंची आणि सुमारे १,१०० टन वजनाचे हे जहाज पाण्याखालील युद्धात उत्कृष्ट कामगिरी करते. ज्यामध्ये टॉर्पेडो, बहु-कार्यात्मक पाणबुडीविरोधी रॉकेट्स आणि प्रगत ‘रडार’ आणि ‘सोनार’ यांचा समावेश आहे.
अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टचा समावेश केल्यामुळे भारतीय नौदलाची एएसडब्ल्यू क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, आणि त्यामुळे किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा वाढेल. ८० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्री वापरण्यात आल्यामुळे ‘माहे’ ची निर्मिती आणखी एक मैलाचा दगड ठरली आहे. ही गोष्ट सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दृष्टिकोनाला आणखी बळकटी देणारी आहे.