ठाणे : जगातील पाचव्या क्रमांकाची ज्वेलरी विक्रेता आणि भारतातील सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने आपल्या प्रमुख ‘हंगर फ्री वर्ल्ड’ या उपक्रमाचा विस्तार आता इथिओपियापर्यंत केला आहे. भारत आणि झांबियामधील उल्लेखनीय यशानंतर हा उपक्रम आता आफ्रिका खंडातील आपल्या पुढील विकास टप्प्यात प्रवेश करत आहे. भारतीय करुणा आणि सामूहिक प्रगतीच्या मूल्यांवर आधारित हा उपक्रम हे सिद्ध करतो की भारतीय उद्योग स्थानिक यशातून जागतिक प्रभाव निर्माण करू शकतात. मालाबार समूह आपल्या निव्वळ नफ्याच्या ५ टक्के रक्कमेचा सतत समाजकार्यासाठी वापर करतो — जो भारतातील अनिवार्य सीएसआर खर्चाच्या दुप्पट आहे.
ही घोषणा दुबई गोल्ड सूकमधील मालाबार इंटरनॅशनल हब येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली. या वेळी मालाबार समूहाचे उपाध्यक्ष अब्दुल सलाम के.पी. यांनी दुबईस्थित इथिओपियाचे महावाणिज्यदूत महामहिम असमेलाश बेकेले यांना अधिकृतरित्या आशयपत्र सुपूर्द केले. या प्रसंगी मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या वरिष्ठ व्यवस्थापन सदस्यांची उपस्थिती होती.
‘हंगर फ्री वर्ल्ड’ ही मालाबार गोल्ड अँड डायमंड्सची सर्वात प्रभावी पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय (ESG) उपक्रमांपैकी एक आहे. सध्या ही योजना जगभरातील ११९ ठिकाणी दररोज १,१५,००० हून अधिक जेवण उपलब्ध करून देते. झांबियातील यशानंतर आता हा प्रकल्प इथिओपियामध्ये सुरू होत असून, मे २०२४ पासून झांबियातील तीन शाळांमध्ये ९ लाखांहून अधिक जेवण वितरित करण्यात आली आहेत.
मालाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद म्हणाले, “हंगर फ्री वर्ल्ड ही आमच्या सर्वात अर्थपूर्ण आणि प्रभावी ESG उपक्रमांपैकी एक आहे. जबाबदार ज्वेलर म्हणून आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांप्रती आमची बांधिलकी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नाही. इथिओपिया सरकारसोबतच्या भागीदारीत आम्ही पुढील दोन वर्षांत सुमारे ८.६४ लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करू. याअंतर्गत २०२६ अखेरपर्यंत १०,००० मुलांना दररोजचे भोजन तसेच शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”