दूरदर्शनवरून महाकाव्य ‘महाभारत’चे पुन्हा लवकरच प्रक्षेपण

0

नवी दिल्ली : कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्कने भारताच्या सर्वात लोकप्रिय महाकाव्यांपैकी एक असलेल्या – ‘महाभारता’ची कृत्रिम प्रज्ञा आधारित एक अभूतपूर्व पुनर्कल्पना जाहीर केली आहे. या मालिकेचा एक्सक्लुझिव्ह डिजिटल प्रीमियर २५ ऑक्टोबर रोजी वेव्हज ओटीटीवर प्रदर्शित केला जाईल आणि त्यानंतर २ नोव्हेंबरपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता दूरदर्शनवर प्रसारित होईल. ही मालिका वेव्हज ओटीटीच्या माध्यमातून एकाच वेळी भारतभर आणि जगभरातील डिजिटल प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल.

अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाने भारताच्या सार्वजनिक प्रसारकाचा वारसा आणि देशव्यापी पोहोच पुढील पिढीच्या मीडिया नेटवर्कच्या सर्जनशील नवोपक्रमाशी जोडण्‍यात आले आहे. प्रगत कृत्रिम प्रज्ञेवर आधारित साधनांचा वापर करून, ही मालिका महाभारताचे विशाल विश्व, त्यातील पात्रे, युद्धभूमी, भावना आणि नैतिक व्दंव्द नव्या दृश्यात्मक भव्यतेसह आणि आकर्षक वास्तवतेच्या प्रभावी रूपात साकारली गेली आहे. हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ आणि डिजिटल इंडियाच्या भावनेला मूर्त रूप देतो, जो वारसा आणि नवोन्मेष यांचा संगम कसा साधता येतो याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

या सहकार्याबद्दल बोलताना, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव व्दिवेदी म्हणाले, “प्रसार भारतीने नेहमीच प्रत्येक भारतीय घरात राष्ट्रीय आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या कथा पोहचवल्या आहेत. लॉकडाऊच्या काळात मूळ महाभारताच्या पुनर्प्रसारणाने आपल्याला आठवण करून दिली की या कथा कुटुंबांना आणि पिढ्यांना किती खोलवर बांधून ठेवू शकतात. या कृत्रिम प्रज्ञेवर आधारित पुनर्कल्पनावर भागीदारी केल्याने प्रेक्षकांना भारतातील महान महाकाव्यांपैकी एकाचा नव्याने अनुभव घेता येईल, यात कथा मांडणीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना परंपरेचा सन्मान केला जातो. आधुनिक प्रसारणात विकास आणि विरासत एकत्र येण्याची ही अभिव्यक्ती आहे.”

प्रसार भारतीचे अधिकृत ओटीटी व्यासपीठ ‘वेव्हज’, भारताची समृद्ध संस्कृती, बातम्या आणि मनोरंजन एकाच डिजिटल मंचावर एकत्र आणते. व्हिडिओ-ऑन-डिमांड, लाइव्ह इव्हेंट्स आणि टीव्ही, रेडिओ, ऑडिओ आणि मासिकाच्या माध्यमातून आशयाचा विस्तृत ‘बुकें’सह, वेव्हजने आपल्या विश्वासार्ह, कुटुंब-अनुकूल आणि बहुभाषिक कार्यक्रमाद्वारे लाखो प्रेक्षक झपाट्याने मिळवले आहेत. समावेशकता, नावीन्य आणि वारसा या आधारस्तंभांवर बांधलेले हे व्यासपीठ भारताच्या कालातीत वारशाला अत्याधुनिक कथा मांडणीशी जोडते. कलेक्टिव्ह कृत्रिम प्रज्ञा आधारित महाभारतासोबतचे त्यांचे सहकार्य हे दर्शवते की, तंत्रज्ञान आणि परंपरा कशा प्रकारे भारत आणि जगभरातील प्रेक्षकांना आवडतील अशा शक्तिशाली, समकालीन कथा तयार करू शकतात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech