मराठी माणूस वैश्विक, संकुचित विचार शोभत नाही…!

0

शिंदेंच्या घोषणेवर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

मुंबई : गुजराती समाजाच्या कार्यक्रमात ‘जय गुजरात’ म्हंटल्यामुळे एकनाथ शिंदेंचे प्रेम गुजरातवर जास्त आणि मराठी व महाराष्ट्रावर कमी झाले का? एवढा संकुचित विचार मराठी माणसांना शोभत नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात घोषणावर विरोधकांकडून झालेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून चांगलाच वाद सुरु आहे. असं असतानाच आज, शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा ‘जय गुजरात’ ही घोषणा दिली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदेंच्या या घोषणेनंतर विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांची स्तुती करत एक शेर ऐकून दाखवला. एकनाथ शिंदे म्हणाले की, “आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है,

दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है

आपके आनेसे यहाँ की हवा का नूर बदल जाता है,

आपके नाम से हर शख्स अदब से झुक जाता है”

हा शेर सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यानंतरशिवसेनेच्या उबाठा गटाने एकनाथ शिंदेवर विखीरी टीका सुरू केली आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर विखारी टीका केली. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील जोरदार टीकास्त्र सोडले तसेच इसरही विरोधक यावर बोलले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, मराठी माणूस हा वैश्विक असून मराठी माणसांनी अटकेपार झेंडा फडकवलेला आहे. याच मराठी माणसांनी संपूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात योगदान दिले आहे. संपूर्ण भारतातील मोगली सत्ता घालवण्याची आणि दिल्लीवर भगवा झेंडा फडकावण्याचे काम मराठी माणसांनी केल. मग एवढा संकुचित विचार जर कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

फडणवीसांनी सांगितले की, आपल्याला आठवण करून देतो की यापूर्वी एकदा चिकोडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली होती. मग त्याचा अर्थ असा घ्यायचा का की त्यांचे कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही, असे समजायचे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. असेच महाराष्ट्रात मराठीचा आग्रह करू शकतो दुराग्रह नव्हे असेही फडणवीस म्हणाले. तसेच गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही.त्यामुळे जय गुजरात म्हणणे आक्षेपार्ह ठरत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech