जेईई ऍडव्हान्स्ड २०२५ चा निकाल जाहीर

0

नवी दिल्ली : कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी-कानपूर) आज, सोमवारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात आयआयटी दिल्ली झोनमधील रजित गुप्ता अखिल ऑल इंडिया टॉपर ठरला. त्याने ३६० पैकी ३३२ गुणांसह देशात पहिले रँक मिळवले आहे. जेईई ऍडव्हान्स्ड २०२५ परीक्षेत ऑल इंडिया रँक १ मिळवलेला रजित गुप्ता राजस्थानच्या कोटा येथील महावीरनगरचा रहिवासी आहे. त्याने यापूर्वी जेईई मेन (एप्रिल सत्र) मध्ये सोळावे स्थान पटकावले होते. तर जानेवारीमधील सत्रात १०० टक्के पर्सेंटाईल मिळवले होते. ही परीक्षा दिलेले उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड आणि फायनल उत्तरसूची jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. जेईई ऍडव्हान्स्ड २०२५ ही परीक्षा १८ मे रोजी संगणक आधारित चाचणी (सीबीटी) स्वरूपात घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज, सोमवारी २ जून रोजी जाहीर करण्यात आला.

उमेदवारांना स्कोअरकार्ड पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर नमूद करावा लागेल. यंदाच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत तीव्र स्पर्धा दिसून आली. पेपर १ आणि पेपर २ या दोन्हीमधील गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील एकूण गुणांच्या आधारे रँक निश्चित करण्यात आली. आयआयटी प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा जेईई ऍडव्हान्स्ड २०२५ परीक्षा १.८ लाखांहून अधिक उमेदवारांनी दिली होती. यामध्ये रजित गुप्ता (एआयआर- १) ,सक्षम जिंदाल (एआयआर-२),माजिद मुजाहिद हुसेन (एआयआर-३), पार्थ मंदार वर्तक (एआयआर-४), उज्ज्वल केसरी (एआयआर-५ ), अक्षत कुमार चौरसिया(एआयआर-६ ), साहिल मुकेश देव (एआयआर-७ ), देवेश पंकज भैया (एआयआर-८), अर्णव सिंग (एआयआर-९) आणि वदलामुडी लोकेश (एआयआर-१०) पटकावले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech