मुंबई : कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘लाफ्टर शेफ्स सीझन २’ चा ग्रँड फिनाले रविवारी (दि.२७) पार पडला असून अभिनेता करण कुंद्रा आणि युटूबर एल्विश यादव यांनी या सीझनची ट्रॉफी जिंकली आहे. या शोचा पहिला सिझन अली गोन आणि राहुल वैद्य या जोडीने जिंकला होता. यावेळी अली गोन आणि रिम शेख यांची जोडी फर्स्ट रनरअप ठरले आहेत.‘लाफ्टर शेफ २’ च्या ग्रँड फिनालेमध्ये सोनाली बेंद्रे उपस्थित होती. ती तिच्या आगामी रिअॅलिटी शो ‘पत्नी और पंगा’ च्या प्रमोशनसाठी आली होती. या दरम्यान तिने शोमधील इतर स्पर्धकांसोबत खूप मजा-मस्ती केली, ज्याचे काही झलक प्रोमोमध्येही दाखवले आहेत. या शोचा फिनाले पार पडल्यामुळे चाहते खूप भावूक झाले. एल्विश यादव आणि करण कुंद्रा यांनी शो जिंकल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी या जोडीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
‘लाफ्टर शेफ्स २’ या शोचे सूत्रसंचालन भारती सिंग करत होती, तर शेफ हरपाल सिंह सोखी हे शोचे न्यायाधीश होते. या सीझनमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, समर्थ जुरेल, अभिषेक कुमार, सुदेश लहरी, निया शर्मा, अली गोनी, रीम शेख, रुबीना दिलैक आणि राहुल वैद्य हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. एल्विश यादवचा कलर्स टीव्हीवरील हा दुसरा शो आहे, जो त्याने जिंकला आहे. याआधी तो बिग बॉस ओटीटी सीझनमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि त्याने ती ट्रॉफीही जिंकली होती.