विधानभवनातल्या राड्यानंतर कुणाल कामराने कविता करत सरकारवर केली टीका

0

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी(दि.१७) संध्याकाळी भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली आणि त्यात एकमेकांचे कपडेही फाडण्यात आले.या घटनेवरून आता कॉमेडियन कुणाल कामराने सरकारला डिवचलं आहे. हाणामारीच्या व्हिडीओवर उपरोधिक कविता करत त्याने निशाणा साधला आहे.

कुणाल कामरा कविता करत म्हणाला कि, ‘होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर..’ अशा शब्दांत त्याने महायुती सरकारवर टीका केली आहे. हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ एडिट करून त्यावर कुणालने त्याची ही उपरोधिक कविता सादर केली आहे. ‘कायदा मोडणारे’ असं कॅप्शन देत कुणालने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसत आहेत. त्यानंतर पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही झलक पहायला मिळते. ‘होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर.. पुलिस के पंगे चारो ओर… एक दिन.. मन में नथुराम, हरकतें आसाराम.. हम होंगे कंगाल एक दिल’ अशी कविता त्याने या व्हिडीओला जोडली आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बुधवारी विधान भवनाच्या प्रवेशद्वारात जोरदार भांडण झालं होतं. या घटनेनंतर या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या असून त्याच अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ही घटना अतिशय चुकीची आहे. विधान भवनाचा परिसर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अखत्यारित येत असून त्यांनी याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech