मुंबई : भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन ट्विट करून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. विविध राज्यांमध्ये संसद सदस्य आणि राज्यपाल म्हणून काम करताना, माननीय राज्यपाल राधाकृष्णन जी यांनी विविध कायदेविषयक आणि घटनात्मक बाबींमध्ये व्यापक कौशल्य मिळवले आहे. उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड आपल्या सर्वांना, महाराष्ट्रीयन म्हणून, अभिमानाने भरून टाकते, असेही म्हटले आहे.